-
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘होणार सून मी ह्या घरची’,’प्रेमाची गोष्ट’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकांचे आजही कौतुक होते.
-
तेजश्री लवकरच झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे तिच्या नवीन मालिकेचे नाव आहे. अभिनेता सुबोध भावे तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
-
आता अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर शशांक सानेने हे फोटो शेअर केले आहे.
-
पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स तिने परिधान केली आहे. विविध पोझमधील तिचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
-
तेजश्रीच्या या फोटोंवर छाया कदम यांच्यासह अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केले आहे.
-
आता चाहते अभिनेत्रीच्या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका तेजश्रीच्या इतर मालिकांप्रमाणेच गाजणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: शशांक साने आणि तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)
मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी तेजश्री प्रधानने केले फोटोशूट; तुम्ही ‘हे’ फोटो पाहिलेत का?
Tejashri Pradhan photos: अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच सुबोध भावेसह लवकरच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Title: Tejashri pradhan photo shoot before release her serial vin doghantali hi tutena nsp