• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 best k dramas for thrillers and rom coms lovers releasing in july 2025 watch on ott kvg

‘स्क्विड गेम’ सीरीज आवडली, मग या आठ कोरियन मालिका नक्कीच पाहा, पाहा यादी

K-Dramas Heat Up July 2025: तुम्हाला जर कोरियन कलाकृती पाहण्याची आवड असेल तर या आठ वेबसिरीज चुकवू नका.

Updated: July 5, 2025 00:07 IST
Follow Us
  • korean dramas july 2025
    1/9

    कोरियन चित्रपट-मालिका प्रेमींसाठी हा जुलै २०२५ खूप खास असणार आहे, कारण या महिन्यात अनेक नवीन आणि बहुप्रतिक्षित मालिका प्रदर्शित होणार आहेत. रोमान्स, थ्रिलर, अॅक्शन आणि मानवी नातेसंबंधांची खोली अशा भावनांचा खेळ के-ड्रामामध्ये पाहायला मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या नवीन मालिका प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहेत. (Still From Film)

  • 2/9

    Bitch X Rich 2
    रिलीज तारीख :
    ३ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: वियू, विकी, नेटफ्लिक्स
    पहिल्या सीझनच्या यशानंतर, ‘बिच एक्स रिच २’ संपत्ती आणि महत्त्वाकांक्षेच्या लढाईसह परत येत आहे. एका प्रतिष्ठित शाळेत अनेक रहस्यमयी घटना, कारस्थाने आणि सत्तेचा खेळ चालणार आहे. त्यामुळे हा सीझन आणखी रोमांचक होणार आहे. (Still From Film)

  • 3/9

    Law and the City
    रिलीज तारीख:
    ५ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: डिस्ने+हॉटस्टार
    या मालिकेत एका शहरातील न्यायालयात काम करणाऱ्या तरुण वकिलांची कथा दाखवली गेली आहे. व्यावसायिक खटले आणि वैयक्तिक संकटांचा सामना हे वकील करतात. हाय-प्रोफाइल प्रकरणे, वैयक्तिक संघर्ष आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या, असा कोर्टरुम ड्रामाचा प्रकार या मालिकेत आहे. (Still From Film)

  • 4/9

    S Line
    रिलीज तारीख:
    ११ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: वेव्हवे
    एक गूढ हॉटलाइन दोन अनोळखी लोकांना एकमेकांच्या संपर्कात आणते. दोन व्यक्तींच्या संपर्कानंतर त्यांची गूढ रहस्ये आणि अपूर्ण नातेसंबंधाचा उलगडा होत जातो. ही मालिका भावनिक थरार आणि सस्पेन्सचे एक उत्तम मिश्रण आहे. (Still From Film)

  • 5/9

    Low Life
    रिलीज तारीख:
    १६ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: जिओहॉटस्टार
    या मालिकेत एका पुर्वाश्रमीच्या गुंडाची कहाणी आहे. तो आपला भूतकाळ मागे सोडून चांगल्या मार्गावर चालू लागतो. ही मालिका गुन्हेगारी जग आणि मानवी भावनांची सुंदरपणे गुंफण करते. समाजात वाईट माणसाचीही सुधारणा शक्य आहे, हे मालिका दर्शवते. (Still From Film)

  • 6/9

    The Nice Guy
    रिलीज तारीख:
    १८ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: विकी, जेटीबीसी
    एक अशी व्यक्ती जी बाहेरून चांगली आणि दयाळू दिसते, पण आतून त्याचे खरे स्वरूप काहीतरी वेगळेच असते. ही मालिका प्रेक्षकांना ‘चांगल्या व्यक्ती’ची व्याख्या काय आहे? याचा विचार करायला लावते. (Still From Film)

  • 7/9

    The Defects
    रिलीज तारीख:
    २१ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: ENA
    सामान्य गुप्तहेर ज्या प्रकरणांची उकल करू शकत नाहीत, ती सोडवण्यासाठी काही विचित्र सवयी आणि विशेष कमतरता असलेल्या लोकांची एक टीम तयार केली जाते, असे या मालिकेत दाखविण्यात आले आहे. यातील पात्रे, थरार आणि गुन्हेगारी रहस्य यांचे रंजक असे मिश्रण आहे. (Still From Film)

  • 8/9

    Try: A Miracle in Us
    रिलीज तारीख: २५ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: अमेझॉन प्राइम व्हिडिओ
    यातील कथा एका अपयशी युवा रग्बी क्लब संघाची आहे. हा अपयशी संघ पराभवाचे विजयात रूपांतर करण्यासाठी संघर्ष करत असतो. मैत्री, संघर्ष आणि आत्मविश्वासाची ही प्रेरणादायी कहाणी संघभावनेची शक्ती दाखवते. (Still From Film)

  • 9/9

    Trigger
    रिलीज तारीख:
    २५ जुलै २०२५
    स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
    एक अनुभवी माजी सैनिक जो आता समस्या सोडवणारा व्यक्ती झाला आहे, तो केवळ बाहेरील जगातील धोक्यांनाच तोंड देत नाही तर स्वतःच्या समस्यांशीही लढतो. हा एक सस्पेन्सफुल आणि अॅक्शनने भरलेला मानसशास्त्रीय थ्रिलरपट आहे, जो तुम्हाला शेवटच्या दृश्यापर्यंत खिळवून ठेवेल. (Still From Film)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 8 best k dramas for thrillers and rom coms lovers releasing in july 2025 watch on ott kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.