-
मलेशियातील भारतीय वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री लिशालिनी कनारनने एका हिंदू पुजाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केल्यामुळे मलेशियात खळबळ उडाली आहे. पुजाऱ्याने मंदिरात आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
लिशालिनी कनारनने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून हा आरोप केला आहे. मलेशियाच्या सेंपाग जिल्ह्यातील मरिअम्मन मंदिरात सदर प्रकार घडल्याचा दावा तिने केला आहे. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
२०२१ साली लिशालिनीने मिस ग्रँड मलेशिया हा पुरस्कार पटकावला होता. ती मलेशियामध्ये अभिनेत्री, टीव्ही अँकर म्हणून प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही ती भारतीय वेशभुषेत फोटोसेशन करताना दिसते. तसेच भारतीय उत्सव साजरे करताना दिसते. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
लिशालिनीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, सदर घटना २१ जून रोजी घडली. ती एकटीच मंदिरात गेली असताना पुजाऱ्याने आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने तिला वेगळ्या खोलीत बोलवले आणि तिथे विनयभंग केला. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
पुजाऱ्याने भारतातून आणलेले पवित्र पाणी आणि हातावर बांधण्याचा धागा द्यायचे असल्याचे सांगितले. चेहऱ्यावर पवित्र पाणी शिंपडल्यानंतर पुजाऱ्याने कपड्यात हात घातला, असा दावा लिशालिनीने केला आहे. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
लिशालिनीने जेव्हा पुजाऱ्याचा विरोध केला. तेव्हा त्याने मंदिरात तंग कपडे घालून आल्याबद्दल तिला सुनावले. तसेच मी ईश्वराचा सेवक असून मी जे करतो त्याला आशीर्वाद समजून घे, असेही त्याने सांगितल्याचे लिशालिनीने पोस्टमध्ये म्हटले. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
दरम्यान लिशालिनीने याची पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तिलाच गप्प राहण्यासाठी धमकावले. ही बाब बाहेर आली तर तुझीच बदनामी होईल, असे पोलिसांनी सांगितले. या पुजाऱ्याच्या विरोधात आधीही तक्रारी आल्या होत्या. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
अखेर लिशालिनीने हा सर्व प्रसंग सोशल मीडियावर विस्तृतपणे लिहिला. यानंतर सेपांग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता आरोपी पुजाऱ्याला अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र तो फरार असल्याचे सांगण्यात येते. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
-
दरम्यान या घटनेमुळे आपल्याला मानसिक धक्का बसला असल्याचे लिशालिनीने सांगितले. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत राहणार नाही, असा निर्धार तिने व्यक्त केला. (Photo – Instagram / @lishallinykanaran)
Lishalliny Kanaran: “त्यानं माझ्या कपड्यात हात…”, हिंदू पुजाऱ्याकडून मलेशियन मॉडेलचा विनयभंग; सोशल मीडियावर सांगितली आपबिती
Malaysia Model Lishalliny Kanaran: मलेशियातील भारतीय वंशाची मॉडेल लिशालिनी कनारननं हिंदू पुजाऱ्यावर विनयभंगाचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
Web Title: Indian origin model molested in hindu temple of malaysia who is beauty queen lishalliny kanaran kvg