-
Filmfare Awards Marathi 2025: मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा ‘फिल्मफेअर मराठी’ हा पुरस्कार सोहळा १० जुलै २०२५ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
२६ जुलै २०२४ रोजी ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati Marathi Movie) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
भावनिक नात्यांची गोष्ट हा ‘घरत गणपती’ या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
-
नातेसंबंधांतील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो.
-
मायेने आणि आपलेपणाने नाती जोडणाऱ्या घरत कुटुंबातील गणेशाचे आगमन आणि त्यानिमित्ताने पुन्हा जुळणाऱ्या आपुलकीची नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात नव्या-जुन्या कलाकारांची फौज आहे.
-
या चित्रपटात डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, अजिंक्य देव, संजय मोने, अश्विनी भावे, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, भूषण प्रधान, निकिता दत्ता, आशिष पाथोडे, रुपेश बने, राजसी भावे, दिव्यलक्ष्मी मैस्नाम यांच्या भूमिका (Movie Star Cast) आहेत.
-
‘घरत गणपती’ हा नवज्योत बांदिवडेकर (Navjyot Bandiwadekar) या दिग्दर्शकाचा पदार्पणातील (1st Movie As Director) चित्रपट आहे.
-
नवज्योतला या चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर मराठी’चा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक हा पुरस्कार (Filmfare Award Best Debut Director) देण्यात आला.
-
नवज्योत हा शिवडी विधानसभा शिवसेना (ठाकरे गट) आमदार अजय चौधरी (Shivadi Assembly Constituency ShivSena MLA Ajay Choudhari) यांचा जावई आहे.
-
नवज्योतच्या पत्नीचे नाव अश्विनी अजय चौधरी (Ashwini Ajay Choudhari) असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नवज्योत बांदिवडेकर/इन्स्टाग्राम)
Photos: शिवसेना आमदाराच्या जावयाला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर पुरस्कार
मायेने आणि आपलेपणाने नाती जोडणाऱ्या घरत कुटुंबातील गणेशाचे आगमन आणि त्यानिमित्ताने पुन्हा जुळणाऱ्या आपुलकीची नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात नव्या-जुन्या कलाकारांची फौज आहे.
Web Title: Shivsena mla son in law director navjyot bandiwadekar won filmfare awards marathi 2025 gharat ganpati movie sdn