• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif news interesting and unknown facts about her salman khan ranbeer kapoor dating and marriage with vicky kaushal scj

Katrina Kaif : कतरिना कैफ; कधीच शाळेत न गेलेली सुपरस्टार!

Katrina Kaif : कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग सुरु केलं होतं.

Updated: July 16, 2025 16:15 IST
Follow Us
  • Katrina Kaif News
    1/14

    बॉलिवूडची चार्मिंग गर्ल अशी कतरिना कैफची ओळख आहे. तिने विकी कौशलशी लग्न करुन संसार थाटला आहे. आज ती ४२ वर्षांची झाली आहे. तिच्या आईने एकटीने तिला मोठं केलं आहे.

  • 2/14

    कतरिना कैफ खूप लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या आईला कुठलीही आर्थिक मदत केली नाही. आईने तिच्यासह इतर मुलांना एकटीने वाढवलं. घरातली परिस्थिती पाहून १४ व्या वर्षी कतरिनाने मॉडेलिंग सुरु केलं. (सर्व फोटो सौजन्य-कतरिना कैफ, इन्स्टाग्राम पेज)

  • 3/14

    कतरिना तिच्या मैत्रिणींसोबत भारतात आली. ती एक सामान्य ट्रिप होती, तरी तिला स्वतःला माहिती नव्हते की ही ट्रिप तिच्या आयुष्याची दिशा बदलेल. भारतात आल्यानंतर कतरिनाने ‘बूम’ चित्रपटातून पदार्पण केले, परंतु तो चित्रपट खूपच फ्लॉप झाला. महेश भट्ट यांनीही तिला एका रात्रीत त्यांच्या चित्रपटातून काढून टाकलं होतं.

  • 4/14

    त्या परिस्थितीत कतरिनाला वाटले की तिचे फिल्मी करिअर संपले आहे, परंतु सलमान खान तिच्या आयुष्यात आल्यावर तिचे नशीब बदलले.

  • 5/14

    कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे होते, तर तिची आई सुझान टर्कोट ब्रिटिश नागरिक होती. लग्नानंतर कतरिनाचे पालक हाँगकाँगमध्ये स्थायिक झाले. कतरिनाचा जन्म तिचा मोठा भाऊ सेबॅस्टियन आणि तीन मोठ्या बहिणी स्टेफनी, क्रिस्टीन आणि नताशा यांच्यानंतर झाला. कतरिनाच्या नंतर मेलिसा, सोनिया आणि इसाबेल या आणखी तीन लहान बहिणी जन्माला आल्या.

  • 6/14

    कतरिना कैफ एका मुलाखतीत म्हणाली होती, वडिलांच्या अनुपस्थितीमुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण होते, ज्यामुळे प्रत्येक मुलीला असुरक्षित वाटते. जेव्हा मला मुले होतील तेव्हा मी त्यांना आई आणि वडिलांचे प्रेम मिळावे यासाठी प्रयत्न करेन.

  • 7/14



    कतरिनाची आई सुझान एका सामाजिक संस्थेत काम करू लागली. त्यामुळे तिला दर दोन वर्षांनी देश बदलावा लागत असे. अशा परिस्थितीत कतरिन कधी चीनला जायची, कधी जपानला, मग फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, हवाईला आणि नंतर ती १४ वर्षांची असताना तिच्या कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाली. देश वारंवार बदलल्यामुळे कतरिनाला कधीच शाळेत जाता आले नाही. तिच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी घरीच ट्यूटर ठेवले होते.

  • 8/14


    कतरिनाने वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. तिने हवाईमध्ये झालेल्या एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली. त्यानंतर, कतरिनाला एका ज्वेलरी ब्रँडसाठी मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तिला सतत मॉडेलिंग प्रोजेक्ट मिळू लागले.

  • 9/14

    कतरिना भारतात आल्यानंतर एक यशस्वी अभिनेत्री बनली. सलमान खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार या तिघांसह तिने काम केलं. टायगर जिंदा है च्या तिन्ही पार्टमध्ये कतरिना होती. तसंच शाहरुख खान बरोबरही कतरिनाने काम केलं.

  • 10/14


    कतरिनाला सुरुवातीला हिंदी चित्रपटात भूमिका मिळाल्या नाहीत. मात्र तिला जेव्हा राम गोपाल वर्माच्या ‘सरकार’ चित्रपटात अभिषेक बच्चनच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहिले गेले तेव्हा तिची भूमिका आणि सौंदर्य यामुळे तिने लोकांची मनं जिंकली.

  • 11/14

    कतरिनाला आधी सलमान खान आणि त्यानंतर रणबीर कपूर डेट करत होता. रणबीर आणि कतरिना हे दोघं तर लिव्ह इनमध्ये राहात होते अशाही बातम्या समोर आल्या. पण नंतर त्यांचं ब्रेक अप झालं. कतरिना कैफने आता विकी कौशलशी लग्न केलं आहे.

  • 12/14

    विकी कौशल आणि कतरिना कैफची प्रेमकहाणी खूपच खासगी राहिली आहे. असे म्हटले जाते की दोघांची पहिली भेट झोया अख्तरच्या घरी झाली होती, परंतु पिंकव्हिलाशी बोलताना विकीने सांगितले होते की तो एका शोचे सूत्रसंचालन करताना पहिल्यांदाच कतरिनाला भेटला होता.

  • 13/14

    २०१० आणि २०११ मध्ये, बार्बी डॉल्स बनवणारी कंपनी मॅटेलने भारतात कतरिना कैफची बार्बी लाँच केली. कतरिना ही पहिली बॉलीवूड अभिनेत्री आहे जिची बार्बी डॉल बनवली गेली आहे.

  • 14/14

    कतरिना कैफचा हा बार्बी लूक चांगलाच चर्चेत आला होता.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Katrina kaif news interesting and unknown facts about her salman khan ranbeer kapoor dating and marriage with vicky kaushal scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.