-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गडद पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली असून ती सूर्यप्रकाशासारखी झळाळून दिसत आहे.
-
या लूकला तिने सुंदर झुमके आणि हातातील कड्यांची साथ दिली आहे, जी पारंपरिक सौंदर्याला अधोरेखित करते.
-
पार्श्वभूमीला ऑरेंज आणि लाल रंगाचा टोन असून तो तिच्या लूकला अधिक उठावदार बनवतो.
-
“Everywhere you go… take the sunshine with you ” असे कॅप्शन देत तिने आपल्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवलं.
-
सोनालीच्या या स्टाइलिश लूकला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
-
ती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आणि टेलिव्हिजन शोमध्ये झळकत असून तिचं सौंदर्य आणि आत्मविश्वास नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली बेंद्रे/ इंस्टाग्राम)
Photos:पिवळ्या रंगाच्या रेशमी साडीत सोनाली बेंद्रेचा मनमोहक लूक
सोनाली बेंद्रे हिचा चमकदार पिवळ्या साडीतला ‘सनशाईन लूक’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पारंपरिक दागिन्यांसह तिने दिलेला हा लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय.
Web Title: Bollywood actress sonali bendre yellow silk saree traditional look photos