-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने एका चर्चला भेट दिल्याचे पाहायला मिळते आहे.
-
हे चर्च आशिया खंडातील सर्वात उंच चर्चपैकी एक आहे, अशी माहिती तिने कॅप्शनमधून दिली आहे.
-
हे चर्च कर्नाटकमधील मैसुरमध्ये आहे.
-
दरम्यान, प्राजक्ताने यावेळी फ्लोरल प्रिंटेड वनपिस परिधान केला होता.
-
तिने चर्चच्या आतील फोटोही यावेळी शेअर केले आहेत.
-
या चर्चची रचना डॅली नावाच्या एका फ्रेंच व्यक्तीने केली होती. चर्चला जुळी शिखरं आहेत, ज्यांची उंची १७५ फूट (५३ मीटर) आहे.
-
या चर्चचे नाव ‘सेंट जोसेफ कॅथेड्रल आहे. निओ गॉथिक शैलीतला, हा चर्च १९३६ मध्ये महाराजा कृष्णराज वाडियार चौथे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : मिताली मयेकरच्या न्यू यॉर्कमधल्या खास फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
“आशिया खंडातील सर्वात उंच…”; प्राजक्ता गायकवाडची प्रसिद्ध चर्चला भेट; फोटो शेअर करत सांगितली चर्चची खासियत!
Prajakta Gaikwad visited church: प्राजक्ताने यावेळी फ्लोरल प्रिंटेड वनपिस परिधान केला होता.
Web Title: Prajakta gaikwad visited st joseph s cathedral church mysore karnataka one of the tallest in asia see photos spl