-
‘सैयारा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अनित पड्डा हिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती समोर आली आहे.
-
Yash Raj Films निर्मित ‘सैयारा’ने देश-विदेशात मिळून ३०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटामुळे अनित पड्डा नव्या पिढीतील स्टार म्हणून ओळखली जात आहे.
-
अनितचा पुढचा प्रोजेक्ट ‘न्याय’ हा असून, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘न्याय’ हा कोर्टरूम ड्रामा असून, त्याचं दिग्दर्शन नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांनी केलं आहे.
-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प सैयारा साइन करण्याआधीच पूर्ण झाला होता.
-
YRF अनितला फक्त थिएटर प्रोजेक्टसाठीच पुढे आणण्याचं धोरण आखतेय, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-
सैयारामधील अनितची आणि अहान पांडेची जोडी लोकप्रिय ठरली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनित पड्डा/ इंस्टाग्राम)
‘सैयारा’नंतर अनित पड्डा दिसणार ‘या’ नव्या प्रोजेक्टमध्ये; ओटीटीवर साकारणार वेगळी भूमिका
YRF च्या ‘सैयारा’ चित्रपटातून झपाट्याने यश मिळवलेली अनित पड्डा आता ‘न्याय’ या ओटीटी प्रोजेक्टमधून पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Web Title: Bollywood actress aneet padda after saiyaara new ott film fresh role nyaya svk 05