-
महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला घराघरांत ओळखलं जातं. वैयक्तिक आयुष्यात पूजाने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.
-
पूजा सावंतचा पती सिद्धेश चव्हाण कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री देखील काही दिवस भारतात, तर काही दिवस ऑस्ट्रेलियात असते.
-
पूजा सावंत आणि तिच्या पतीने नुकतीच ऑस्ट्रेलियातील ‘Kangaroo Island’ या ठिकाणी भेट दिली.
-
पूजा पहिल्यापासूनच प्राणीप्रेमी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील प्राणीसंग्रहालयात ती अगदी बिनधास्त वावरत होती.
-
पूजाचा अंगावर साप खेळवतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे साप बिनविषारी असून त्यांना योग्य प्रशिक्षण दिलेलं असतं. याशिवाय पूजाने प्राणीसंग्रहालयातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा साप हातावर घेतला होता. सामान्य लोकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय असं करू नये.
-
पूजाने ‘Kangaroo Island’ फिरताना डेनिम लूक केला होता.
-
अभिनेत्रीच्या डेनिम जॅकेवर MEOW असं लिहिण्यात आलं होतं. या फोटोंना अभिनेत्रीने, “कांगारुच्या देशी Koala च्या कुशीत” असं कॅप्शन दिलं आहे.
-
पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये विविध प्राण्यांची झलक पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, पूजा व तिच्या पतीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “आमची प्राणीप्रेमी पूजा”, “सुंदर पूजा” अशा कमेंट्स युजर्सनी या फोटोंवर केल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )
अंगावर साप खेळवला अन्…; पूजा सावंत पतीसह पोहोचली ‘या’ खास ठिकाणी; म्हणाली, “कांगारुच्या देशी…”
पूजा सावंतचं प्राणीप्रेम! पतीसह ‘या’ खास ठिकाणी दिली भेट, सुंदर फोटो एकदा पाहाच…
Web Title: Pooja sawant wildlife trip with husband to kangaroo island australia see photos sva 00