Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashok saraf on who is his favorite co star shares anecdote of late actor nilu phule also praised laxmikant berde nsp

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे आवडते सहकलाकार कोण? म्हणाले, “त्यांच्यामध्ये अजिबात अहंकार नव्हता”

Ashok Saraf on favorite co star: “सज्जन नट…”, या दिग्गज अभिनेत्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते काय म्हणाले?

August 9, 2025 12:28 IST
Follow Us
  • अशोक सराफ यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. तसेच काही हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांचे व दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचे मोठे कौतुक झाले. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)
    1/9

    अशोक सराफ यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. तसेच काही हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांचे व दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचे मोठे कौतुक झाले. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)

  • 2/9

    आता नुकत्याच ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तुमचा आवडता सहकलाकार कोणता, ज्यांच्याबरोबर काम करायला कायम मजा आली; देवाण-घेवाण करता आली. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)

  • 3/9

    यावर अशोक सराफ म्हणाले, “तसं सचिनबरोबर झालं. नंतर लक्ष्याबरोबर झालं. मी जो मार्ग अवलंबला, त्याच मार्गाने लक्ष्मीकांत आला. त्याने माझं टायमिंग बरोबर पकडलं, त्यामुळे त्याच्याबरोबरचे सीन चांगलेच रंगायचे. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ ५० चित्रपट एकत्र केले.”

  • 4/9

    पुढे ते म्हणाले, “मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची मजा यायची आणि स्क्रीनवरचा जो मी सगळ्यात जेंटलमन नट मी स्क्रीनवरचा पाहिला, ते म्हणजे निळू फुले. इतका ग्रेट माणूस होता.”

  • 5/9

    “पुढची व्यक्ती काय करते याबद्दल त्यांना अजिबात देणंघेणं नव्हतं. त्यांचं काम ते करायचे. एखादी व्यक्ती अमुक एखादी गोष्ट करतो म्हणून करायची, असं त्यांनी कधीच केलं नाही.”

  • 6/9

    पुढे निळू फुले व त्यांचा एक किस्सा सांगत अशोक सराफ म्हणाले की, एक सीन आमच्याकडे आला, त्यामध्ये काही लिहिलं नव्हतं. मग दिग्दर्शकाने ती जबाबदारी आमच्याकडे दिली.

  • 7/9

    मी त्यांना सांगत होतो, त्याला ते होकार देत होते. त्यांचा उत्साह खूप होता. त्यांना सीनमध्ये काय करतील, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते. मी लिहित होतो, म्हणून मी माझ्यासाठी अधिक लिहिलं जाईल, अशी असुरक्षितता त्यांच्यामध्ये नव्हती. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)

  • 8/9

    “त्या सीनचा सराव करताना मी एक डायलॉग विसरलो, तर त्यांनी मला आठवण करून दिली. त्यांच्यामध्ये अजिबात अहंकार नव्हता. कलेशी ते खूप प्रामाणिक होते. त्यांची जागा कोणीतरी घेऊ शकतं, याची त्यांना पर्वा नव्हती. सज्जन नट म्हणतात ना, तर ते तसे होते. मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    निळू फुले आणि अशोक सराफ यांनी ‘ठकास महाठक’, ‘फटाकडी’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘दीड शहाणे’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. (फोटो सौजन्य: अशोक सराफ इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ashok saraf on who is his favorite co star shares anecdote of late actor nilu phule also praised laxmikant berde nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.