-
भूल भुलैया ३
भूल भुलैया ३ हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट भूल भुलैया (२००७) आणि भूल भुलैया २ (२०२२) चा सिक्वेल आहे. चित्रपटात गूढता, विनोद आणि रोमान्सचा तडका आहे, तसेच एक सामाजिक संदेशही आहे. (Photo: YouTube) -
चंद्रमुखी २
या सिनेमाचं कथानक एका श्रीमंत कुटुंबाभोवती फिरते. काही कारणाने पूजा करण्यासाठी हे श्रीमंत कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरी येतं. पण नकळत चंद्रमुखी आणि वैटियन राजा हे दोघे पुन्हा जागे होतात. आता चंद्रमुखी आणि वैटियन राजा आमने-सामने आल्यालवर पुढे काय होणार हे प्रेक्षकांना सिनेमातच पाहायला मिळतं. (Photo: YouTube) -
वॉल्फ मॅन
चित्रपटाची कथा एका अशा माणसाभोवती फिरते जो त्याच्या पत्नी आणि मुलीला, वेअरवॉल्फच्या हल्ल्यातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यालाच वेअरवॉल्फ चावतो आणि तो स्वतःच प्राण्यात रूपांतरित होऊ लागतो. (Photo: YouTube) -
Nosferatu
हा एक जर्मन हॉरर चित्रपटांमधील एक उत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा थॉमस हटर नावाच्या एका तरुण इस्टेट एजंटभोवती फिरते, जो काउंट ऑरलोक नावाच्या रहस्यमय व्यक्तीबरोबर मालमत्तेचा व्यवहार अंतिम करण्यासाठी ट्रान्सिल्व्हेनियाला जातो. हटरला लवकरच कळते की ऑरलोक एक पिशाच आहे. (Photo: YouTube) -
Scream
हा एक भयपट चित्रपट आहे, ज्यामध्ये एका रहस्यमय ghostface लावलेल्या खुनी व्यक्तीने शहरात दहशत माजवलेली असते. तो लोकांना फोन करून त्रास देतो आणि मग त्यांची निर्घृण हत्या करतो. या चित्रपटाची नायिका सिडनी प्रेस्कॉट (Sidney Prescott) आहे, जिच्या आईची हत्या एका वर्षापूर्वी झाली असते. (Photo: YouTube) -
स्त्री २
हा चित्रपट भीती, विनोद आणि रहस्य यांचा योग्य संगम आहे. “स्त्री” केवळ एक हॉरर कॉमेडी चित्रपट नाही, तर त्यासोबतच तो स्त्रियांच्या समस्या आणि समाजातील त्यांच्या स्थानावर भाष्य करतो. (Photo: YouTube) -
There’s Someone Inside Your House
या चित्रपटात, भीती, रहस्य आणि थरार यांचं जबरदस्त अनुभव घेता येतो. यासोबतच, भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील संबंध, गुपितं आणि सामाजिक दबाव यांसारख्या विषयांवर भाष्य केले आहे. (Photo: YouTube) -
13B: Fear Has a New Address
एक व्यक्ती अपार्टमेंट क्रमांक १३बी या एका नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला जातो. लवकरच, त्याला कळते की “सब खैरियत है” नावाच्या एका मालिकेतल्या घटना त्याच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे विचित्र चित्र दाखवत आहे. (Photo: YouTube) -
Don’t Listen
हा एक स्पॅनिश हॉरर चित्रपट आहे जो एका कुटुंबाबद्दल आहे. जे एका झपाटलेल्या घरात राहत असते. त्यांचा लहान मुलगा डॅनियल, विचित्र आवाज ऐकू लागतो आणि अलौकिक घटना घडू लागतात. (Photo: YouTube) -
Evil Dead Rise
या चित्रपटाची कथा एका इमारतीत घडते, जिथे एका महिलेला ती गर्भवती असल्याची माहिती मिळते. त्याचवेळी, तिची बहीणआणि तिच्या मुलांना एका भयानक घटनेचा सामना करावा लागतो. (Photo: YouTube) हेही पाहा – आयफेल टॉवर पाहण्यासाठी लोक ‘या’ १० गोष्टींमुळे जातात, तुम्हाला माहिती आहेत का?
Top 10 Trending Horror Movies: भुताटकीचा जबरदस्त थरार; भारतात ट्रेंडिंगला आहेत ‘हे’ रोमांचक १० भयपट…
आज आपण भारतात ट्रेंडिंग असलेल्या टॉप १० हॉरर चित्रपटांची नावे सांगत आहोत. जर तुम्ही हे चित्रपट अजून पाहिले नसतील, तर तुम्ही हे चित्रपट लगेच पाहू शकता.
Web Title: Top 10 trending horror movies in india bhool bhulaiyaa 3 chandramukhi 2 wolf man and more spl