-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची प्रेमकथा आजही चाहत्यांना आकर्षित करते. दोघांनी लग्नाआधी एकमेकांसमोर ठेवलेल्या अटी आजही चर्चेत आहेत.
-
शिल्पा शेट्टीने स्पष्ट सांगितले होते की, ती कधीही एनआरआय किंवा परदेशी व्यक्तीशी लग्न करणार नाही. याच कारणामुळे कुंद्राला भारतात स्थायिक व्हावे लागले.
-
राज कुंद्राचा जन्म आणि संगोपन लंडनमध्ये झाले होते. पंजाबमधून आलेल्या त्याच्या पालकांनी तिथेच कुटुंब वसवले होते. नंतर कुंद्राने दुबईमध्ये व्यवसाय उभा केला.
-
अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमादरम्यान कुंद्राची भेट शिल्पा शेट्टीशी झाली. ‘बिग ब्रदर सीझन ५’ हा शो जिंकलेल्या शिल्पाची मॅनेजर त्याची जवळची मैत्रीण होती आणि त्यामुळे त्यांचा परिचय झाला.
-
शिल्पाशी लग्न करण्यापूर्वी कुंद्राने मोठा निर्णय घेतला. त्याने मुंबईतील जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’समोर उभ्या राहत असलेल्या सात मजली अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी केला.
-
शिल्पाला प्रपोज करताना कुंद्राने हा फ्लॅट तिला भेट दिला. त्या क्षणीच शिल्पाने होकार दिला आणि त्यांची प्रेमकथा पुढे सरकली.
-
शिल्पाच्या वडिलांच्या निधनानंतर तिची आई सुनंदा शेट्टीही या दाम्पत्यासोबत राहू लागली. कुंद्राने स्वतःहून तिला घरी आणले, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले.
-
आज शिल्पा आणि राज कुंद्रा हे दोन मुलांचे आई-वडील आहेत मुलगा वियान आणि मुलगी समीशा. कुटुंबासह ते मुंबईतच आपले आयुष्य आनंदात जगत आहेत.
लग्नाआधी शिल्पा शेट्टीने नवऱ्यासमोर ठेवली ‘ही’ अट; किस्सा सांगताना राजकुंद्रा म्हणाला, “त्या एका शब्दामुळे मी आयुष्यभरासाठी भारतात राहिलो”
एनआरआयशी लग्न न करण्याच्या शिल्पाच्या अटीपासून ते मुंबईत घर खरेदी करून केलेल्या प्रस्तावापर्यंतची राज–शिल्पाची अनोखी कथा
Web Title: Bollywood actress shilpa shetty raj kundra marriage condition mumbai flat love story family svk 05