-
मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला. याचं नाव आहे ऋत्विक तळवलकर.
-
ऋत्विक तळवलकर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैतच्या भावाची म्हणजेच सोहम चांदेकर ही भूमिका साकारत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच ऋत्विकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
-
ऋत्विकच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे अनुष्का चंदक. ती उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
-
अनुष्का आणि ऋत्विक जवळपास ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे.
-
ऋत्विक आणि अनुष्का या दोघांनीही आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला आहे. ऋत्विकने यावेळी काळ्या रंगाचा थ्री पिस ब्लेझर सूट घातल्याचं पाहायला मिळालं.
-
तर, ऋत्विकची होणारी पत्नी अनुष्काने साखरपुड्यात सुंदर अशी अशी डिझायनर साडी नेसली होती.
-
यातील एका फोटोत ऋत्विकच्या एंगेजमेंट रिंगची झलक देखील पाहायला मिळत आहे.
-
सध्या मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : ऋत्विक तळवलकर इन्स्टाग्राम, prajakta_koshe_photography, Edited by @_timeline_pro )
४ वर्षांचं रिलेशनशिप अन्…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा, ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, कोण आहे ‘ती’?
लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा! चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, शेअर केले सुंदर फोटो…
Web Title: Marathi actor rutwik talwalkar engage with girlfriend after 4 years of relationship shares photos sva 00