-

गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने गायिका कार्तिकी गायकवाडने (kartiki gaikwad) पारंपरिक नऊवारी लूक शेअर केला.
-
पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीला लाल शालू परिधान करून, कार्तिकीने गणेशोत्सवासाठी खास लूक साकारला आहे.
-
नथ, गजरा व मोत्यांचे दागिने यांसह लाल रंगाचा पारंपरिक शेला घेतलेली कार्तिकी अतिशय देखणी दिसते.
-
पारंपरिक लूकसोबत कार्तिकीने ‘गणपती बाप्पा मोरया’ हे नवे गाणे चाहत्यांसाठी सादर केले आहे.
-
कार्तिकी गायकवाड नेहमीच लोकसंगीत आणि भक्तिगीतांमुळे ओळखली जाते.
-
तिच्या नव्या गाण्यातून गणरायाचे अधिक भक्तिभावाने स्वागत होणार आहे.
-
सोशल मीडियावर तिचा हा पारंपरिक गणेशोत्सवी लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
-
कार्तिकीने नेहमीप्रमाणे आपल्या सुरेल आवाजाने भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे.
-
गणेशोत्सवाच्या आनंदात तिच्या गणपती बाप्पा मोरया या नव्या गाण्याची भर पडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
Ganeshotsav 2025: भक्तिगीतातून गणरायाचं स्वागत; सुरेल आवाजासोबत पारंपरिक रूपात कार्तिकीचा उत्सवी अंदाज
Web Title: Ganeshotsv 2025 famous singer kartiki gaikwad new song ganpati bappa morya and traditional look photoshoot svk 05