• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. abhijeet khandkekar writes a post for late actress priya marathe shared photos and videos spl

Photos: “तू अजून हवी होतीस…” म्हणत प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीत खांडकेकरने शेअर केले तिच्याबरोबरचे हसरे क्षण

मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरनेही प्रिया मराठेसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रियाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओही शेअर केले आहेत.

September 3, 2025 12:16 IST
Follow Us
  • Abhijeet khandkekar writes post for late actress priya marathe
    1/9

    मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं अवघ्या ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. ३१ ऑगस्ट रोजी तिने तिच्या मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. (Photo: Priya Marathe/Instagram)

  • 2/9

    दरम्यान, तिच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली. अनेकांनी तिच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होतं तिच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या, तर काहींनी तिच्याबरोबरच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. (Photo: Priya Marathe/Instagram)

  • 3/9

    मराठी अभिनेता अभिजित खांडकेकरनेही प्रिया मराठेसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रियाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओही शेअर केले आहेत. (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 4/9

    त्याने लिहिलं की, “नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया…अजूनही खरं वाटत नाहीये की, तू आता नाहियेस आमच्यात…भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एक्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातायत हे पटतच नाहीये मनाला. आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या २ वर्षांत काय-काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवत नाही.” (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 5/9

    अभिजितने प्रियाचा नवरा शंतनू मोघेसाठीही यावेळी त्याच्या पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. “शंतनू, तू ज्या धीराने तिच्या बरोबर होतास त्याला तोड नाही.” (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 6/9

    पुढे तो प्रियाबद्दल म्हणाला, ‘लवकर बरी होणार आहेस तू, बरी झालीस की मस्त पार्टी करू’ असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले. तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. तू अजून हवी होतीस प्रिया….” (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 7/9

    दरम्यान, प्रिया आणि अभिजीत खांडकेकर या दोघांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 8/9

    दरम्यान, प्रिया गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिने अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. (Photo: Abhijeet Khandkekar/Instagram)

  • 9/9

    दरम्यान, प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. (Photo: Priya Marathe/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Abhijeet khandkekar writes a post for late actress priya marathe shared photos and videos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.