-
एम एक्स प्लेयरवर स्ट्रीम होणाऱ्या राईज अँड फॉल’ या अश्नीर ग्रोव्हरच्या रिअॅलिटी शोमध्ये अनाया बांगर सहभागी होत आहे. अनाया ही क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी आणि एक ट्रान्सवुमन आहे.
-
तिचा जन्म एक मुलगा म्हणून झाला आणि आठव्या वर्षापासून तिला स्वतःतील स्त्री खूणावू लागली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनायाने तिचा प्रवास इन्स्टाग्रामवर एका पोस्टमधून सर्वांबरोबर शेअर केला होता.
-
८ व्या वर्षी जाणीव
मी साधारणपणे ८ वर्षांची असताना असं काहीतरी जाणवतं होतं आणि ते मला स्पष्टपणे कळतही नव्हतं. आरशात पाहायचे तेव्हा वाटायचं की ज्या शरीरामध्ये मी राहतेय ते माझं नाहीये. आतल्या आत मला असं वाटायचं की मी मुलगी आहे. सर्वांच्या नकळत मी आईचे कपडेही परिधान करत असे आणि जेव्हा मी असं करायचे तेव्हा स्वत:ला सांगायचे की मला हे बनायचं आहे. मला असं जीवन जगायचं आहे. -
मैदानावर चुकल्यासारखे वाटे…
क्रिकेट हे माझे पहिले प्रेम होते. मी वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळायला सुरुवात केली. नंतर मी मुंबई अंडर १६, अंडर १९, इस्लाम जिमखाना मुंबई आणि यूकेमधील एका क्लबकडून खेळले. मैदानावरही मला काहीतरी चुकल्यासारखे वाटे, कारण मी माझे सत्य लपवत होते, असंही अनायाने लिहिलं आहे. -
हार्मोन थेरपी
२०२३ मध्ये मी हार्मोन थेरपी सुरू केल्यानंतर माझ्या शरीरात बदल होऊ लागले. तेव्हा पहिल्यांदाच मी स्वत:ला भेटले असे वाटले. पण हे सर्व करणे सोपे नव्हते. ही सर्व प्रक्रिया महाग तर होतीच शिवाय अत्यंत वेदनादायी व त्याचवेळी एकाकी पाडणारीही होती. -
उपचारांसाठी पैसे वाचवले
उपचारांसाठी पैसे वाचावेत म्हणून मी तेव्हा दैनंदिन जीवन खूप काटकसर करुन काढले. -
पालकांबद्दल म्हणाली…
पालकांबद्दल म्हणाली…
मला माझ्या पालकांनी हार्मोन थेरपीमध्ये मदत केली आणि मी त्यासाठी खूप कृतज्ञ आहे. पण त्यानंतर मला स्वतः सर्वकाही करावे लागले. सर्वात कठीण भाग म्हणजे क्रिकेट सोडावे लागले. हार्मोन्स आणि ताकद एका महिलेसारखी असल्याचा पुरावा दिल्यानंतरही बीसीसीआय ट्रान्सवुमनना खेळण्याची परवानगी देत नाही, असेही मत तिने या पोस्टमध्ये मांडले आहे. -
मी स्वतःला निवडले
मी स्वतःला निवडले
ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासारख्या देशांमध्ये ट्रान्सवुमनना क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे, पण भारतात ते शक्य नाही. म्हणून मला क्रिकेट आणि स्वतः पैकी एकाची निवड करावी लागली आणि मी स्वतःची निवड केली. -
मित्र दुरावले
माझ्यासाठी यूकेमध्ये राहणं देखील सोपं नव्हतं. मला छळ, टीका आणि लोकांच्या वाईट नजरांचा सामना करावा लागला. भारतात येणे देखील तितकेच कठीण होते. माझे बरेच क्रिकेटपटू मित्र आता माझ्याशी बोलतही नाहीत. काहीवेळा रिजेक्शन्स मला सहन होत नव्हते आणि मला जीवन संपवावेसे वाटायचे. पण मी स्वतः ला सावरलं. -
माझे शरीर, माझी निवड, माझे सत्य.
अलीकडेच तिने रक्षाबंधनाचा सणही तिच्या भावाबरोबर शेअर केला. एका नव्या पोस्टमध्ये अनाया म्हणाली की, “वर्षानुवर्षे वाट पाहिली, लढले आणि अखेर माझे स्वप्न मी स्वतः साठी पूर्ण केले. माझे शरीर, माझी निवड, माझे सत्य.” (सर्व फोटो साभार- इन्स्टाग्राम)
हेही पाहा- तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली प्राजक्ता गायकवाड; फोटोंमध्ये दिसली खास व्यक्ती, म्हणाली “खूप वर्षांपासून…”
Anaya Bangar: माझे शरीर, माझी निवड! आर्यन ते अनाया होण्याचा संघर्षमय प्रवास; ८व्या वर्षी काय घडलं होतं?
Anaya bangar, Rise and fall show, MX Player: क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर नुकतीच एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आर्यनने अनाया हे नाव स्वीकारले आहे. पण तिचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता…
Web Title: Anaya bangar rise and fall reality show how was her journey from boy to trans women in marathi spl