-

मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
प्रिया बापट हिचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील चित्रपटात झळकणार आहे.
-
प्रियाने उमेश कामत, गिरीश ओक, निवेदिता सराफ यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रिया पोस्ट करीत म्हणाली, “सगळे विचारत होते की, मराठी चित्रपट कधी करणार? मीपण विचारत होते; कधी चांगलं कथानक येणार? २०१८ ला ‘आम्ही दोघी’ प्रदर्शित झाला आणि आता १२ सप्टेंबर ला ‘बिन लग्नाची गोष्ट’ येतोय. अखेर योग आला. चांगलं कथानक, अनुभवी व ताकदीचे सहकलाकार, मनाला भिडणारे संवाद, मोट मस्त बांधली आहे. आता तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा”
-
या चित्रपटात प्रिया एका गरोदर महिलेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता जास्त वाढली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
Marathi actrss priya bapat : प्रिया बापटने तिच्या नवीन येणाऱ्या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Web Title: Marathi actress priya bapat post for new movie bin lagnachi gosht viral svk 05