-
‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने या मालिकेत साकारलेल्या सायलीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत ऑनस्क्रीन सर्वांची आईसारखी काळजी घेणाऱ्या सायलीने नुकतेच तिच्या खऱ्या आईबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जुई आणि तिची आई नेत्रा गडकरी या मायलेकी नुकत्याच देवदर्शनाला गेल्या होत्या.
-
जुई आणि तिची आई पंढरपूरला गेल्या होत्या. विठुरायाचं दर्शन घेतल्यावर अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
“पहिल्यांदा पंढरपुरला जाण्याचा योग आला. तो ही अचानक! त्यानेच बोलावून घेतलं. शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो… लाइन जशी पुढे सरकत होती तसा गाभारा हळुहळू दिसू लागला आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले… डोळे, मन भरुन आलं.. शांत वाटलं” असं सुंदर कॅप्शन जुईने तिच्या फोटोंना दिलं आहे.
-
जुईने पंढरपूर मंदिराचा गाभारा, इस्कॉन मंदिरातील हत्ती, चंद्रभागा नदीजवळचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जुईने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आणि या फोटोला अभिनेत्रीने कॅप्शनही खूपच हटके दिलं आहे. यामध्ये मंदिरातील गुरुजींनी तिला सायलीच्या फुलांचा गजरा दिल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळेच अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत याला, “सायलीला जेव्हा गुरुजी ‘सायली’ देतात” असं कॅप्शन दिलं आहे.
-
जुई आणि तिच्या आईने मंदिर परिसरात सुद्धा सुंदर फोटो काढला आहे.
-
याशिवाय विठुरायाचं दर्शन घेतल्यावर जुईने मंदिर समितीची देखील भेट घेतली. ( सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम )
‘ठरलं तर मग’ फेम सायलीच्या खऱ्या आईला पाहिलंत का? मायलेकी पोहोचल्या देवदर्शनाला, सातवा फोटो आहे खूपच खास
जुई गडकरी आणि तिची आई नेत्रा गडकरी ‘या’ठिकाणी पोहोचल्या देवदर्शनाला, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली…
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari visit pandharpur with her mom shares beautiful photo of religious trip sva 00