-
भारतीय चित्रपट कंपन्यांनी ७ सर्वात महागडे गाणे शूट केले आहेत. या यादीत शाहरुख खान, काजोल, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण सारख्या स्टार्सची गाणी समाविष्ट आहेत. जाणून घेऊ किती बजेट खर्चून ही गाणी तयार करण्यात आली आहेत. (Photo: Still from song)
-
एन्थिरा लोगाथु सुंदरैया
रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या २.० चित्रपटातील एन्थिरा लोगाथु सुंदरैया या गाण्याचे बजेट खूप जास्त होते. zoomtventertainment.com सारख्या अनेक माध्यमांनी या गाण्याचे बजेट सुमारे २० कोटी असल्याचा दावा केला आहे. हे गाणे तमिळ भाषेत तयार केले आहे. (Photo: Still from song) -
जिंदा बंदा
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे गाणे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. indiatoday नुसार या गाण्याचे बजेट १५ कोटी होते. या गाण्यात १००० डान्सर पाठीमागे डान्स करतात. हे गाणे लोकांना खूप आवडले. (Photo: Still from song) -
घर मोरे परदेसिया
आलिया भट्टच्या कलंक चित्रपटातील घर मोरे परदेसिया हे गाणे यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या गाण्याचे बजेट सुमारे ७ कोटी होते. (Photo: Still from song) -
गेरुआ
यादीत चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान आणि काजोलचे गेरुआ हे गाणे आहे. फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये गाण्याचे बजेट ७ कोटी सांगितले आहे. हे गाणे रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील आहे. (Photo: Still from song) -
पार्टी ऑल नाईट
अक्षय कुमारच्या बॉस चित्रपटातील पार्टी ऑल नाईट हे गाणे यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. mensxp.com नुसार, या गाण्याचे बजेट ६ कोटी रुपये होते. (Photo: Still from song) -
राम चाहे लीला चाहे
यादीत सहाव्या क्रमांकावर ‘रामलीला, राम चाहे लीला चाहे राम’ या चित्रपटाचे शीर्षकगीत आहे. या गाण्यातील प्रियांका चोप्राच्या नृत्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. mensxp.com नुसार, या गाण्याचे बजेट ६ कोटी होते. (Photo: Still from song) -
ऊ अंटावा
यादीत ७ व्या क्रमांकावर पुष्पामधले ऊ अंटावा हे गाणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याचे बजेट सुमारे ५ कोटी होते. (Photo: Still from song)
अबब…शाहरुख खान, रजनीकांतच्या ‘या’ गाण्यांवर चित्रपट निर्मात्यांनी खर्च केले होते तब्बल इतके कोटी; आकडे वाचून थक्क व्हाल…
भारतात चित्रपटांबरोबरच त्यांची गाणी देखील खूप महत्वाची मानली जातात. अनेक गाणी मोठ्या प्रमाणावर चित्रित केली जातात. या गाण्यांचं बजेट लो बजेट फिल्मस तयार होतील इतकं असतं. आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील काही सर्वात महागड्या गाण्यांबद्दल जाणून घेऊयात..
Web Title: Most expensive songs of indian cinema shah rukh khan kajol gerua to alia bhatt ghar more pardesiya know the budget spl