-
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतील साक्षी महाजन पुढच्या वर्षी लग्न करणार आहे.
-
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेमध्ये यश-अमृता आणि कावेरी-उदय यांच्या लग्नाचं कथानक सुरू आहे.
-
यादरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत साक्षी महाजन हिने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबाबत कबुली दिली.
-
याबद्दल साक्षी म्हणाली, “हो… मी पुढच्या वर्षीच लग्न करणार आहे. त्यामुळे खूप काय काय डोक्यात आहे.”
-
“कोणती स्टाइल करायची? कोणतं फाउंडेशन लावायचं? कुठल्या रंगाची साडी? वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत.”
-
“मालिकेत जे हे काही लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यावरून सुकन्या मोने ताई, मंदार जाधव असे सगळेच चिडवत आहेत.”
-
राजश्री मराठी शोबझशी साधलेल्या संवादात साक्षीने लगबग करणार असल्याची कबुली दिली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेमध्ये साक्षी महाजन ही विद्या नावाची भूमिका साकारत आहे.
‘ही’ मराठमोळी अभिनेत्री पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार, स्वत:च दिली कबुली
‘कोण होतीस तू काय झालीस तू’मधली अभिनेत्री लवकरच करणार लग्न; म्हणाली, “सगळी तयारी…”
Web Title: Kon hotis tu kay zalis tu serial fame actress sakshi mahajan will marry soon ssm 00