-
उषा नाडकर्णी यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी)
-
त्यांच्या मराठी चित्रपटांतील भूमिकांना जितके प्रेम मिळाले, तितकेच प्रेम त्यांना मराठी-हिंदी मालिकांतील भूमिकांसाठीही मिळाले. (फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी)
-
उषा नाडकर्णी अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तपणेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतात. (फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी)
-
आता उषा नाडकर्णींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिंकविलाशी संवाद साधताना त्यांनी फराह खानबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. (फोटो सौजन्य: फराह खान)
-
‘पिंकविला’ने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी त्यांना विचारलं की, फराह खानबरोबर तुमचं नातं कसं आहे? त्यांनी बनवलेलं जेवण लोकांना खूप आवडतं. (फोटो सौजन्य: फराह खान)
-
त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, “ती काही बनवत नाही. ती कुठे काय बनवते. ती लोकांच्या घरी जाते. ते स्वयंपाक करतात. दिलीप त्यांना मदत करतो. फराह काहीच करीत नाही. (फोटो सौजन्य: फराह खान)
-
“ती फक्त सतत लोखंडवाला परिसरात मिळणाऱ्या चिकनचं कौतुक करते.” (फोटो सौजन्य: फराह खान)
-
उषा नाडकर्णी या सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. (फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी)
-
त्या सीझनमध्ये फराह खान परीक्षकाच्या भूमिकेत होती. गौरव खन्ना या सीझनचा विजेता ठरला. (फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी)
“ती लोकांच्या घरी…”, उषा नाडकर्णी फराह खानबद्दल काय म्हणालेल्या?
Usha Nadkarni on Farah Khan: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी फराह खानबद्दल काय म्हणालेल्या? घ्या जाणून…
Web Title: Senior marathi actress usha nadkarni on farah khan says she doesnt cook she goes to peoples homes they cook nsp