-
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
-
सात वर्षांपासून चर्चांमध्ये फेऱ्यांमध्ये असलेल्या या जोडप्याने शुक्रवारी (३ ऑक्टोबर) हैदराबादमध्ये गुप्तपणे साखरपुडा समारंभ उरकला
-
या साखरपुड्याच्या समारंभात केवळ कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते.
-
विजयच्या टीमने या बातमीची पुष्टी केली आहे.
-
साखरपुडा हैदराबादमधील जुबली हिल्स येथील १५ कोटी रुपयांच्या महागड्या वाड्यात झाला.
-
या समारंभाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध नाहीत. कारण- दोघांनीही पोस्ट केले नाही.
-
विजय देवरकोंडा याच्या टीमच्या माहितीनुसार, त्यांचा विवाह फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
-
रश्मिका आणि विजय यांनी २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना वारंवार फोडणी मिळत गेली.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
Photos : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांच्या गुप्त साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख आली समोर
सात वर्षांपासून या दोघांसंबंधीच्या चर्चा आणि तर्क-वितर्कांचा जो धुरळा उडत होता, त्याला या जोडीने आता अधिकृत मान्यता दिली आहे.
Web Title: Actress rashmika mandanna and actor vijay deverakonda engagement and wedding ceremony date reveal svk 05