• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prasad oak share old memories with laxmikant berde also talk abput his son abhinay work experince ssm

“१५-२० दिवस एकत्र काम केलं आणि…”, प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी आठवण

“एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही पण…”, प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण

October 10, 2025 23:45 IST
Follow Us
  • लक्ष्मीकांत बेर्डे
    1/8

    आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आज ते हयात नसले; तरी अनेक चाहते आणि कलाकार त्यांच्याबद्दल आठवण शेअर करीत असतात.

  • 2/8

    अशातच मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल केलेल्या कामाची एक जुनी आठवण सांगितली आहे. तसंच अभिनय बेर्डेबद्दलच्या कामाचा अनुभवसुद्धा शेअर आहे.

  • 3/8

    प्रसाद म्हणाला, “मी एक नाटक करत होतो आणि त्या नाटकाच्या तालमीसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर १५-२० दिवस एकत्र काम केलं. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे हे पाहुणे कलाकार होते.”

  • 4/8

    पुढे तो सांगतो, “मात्र तेव्हाच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना ते नाटक करता आलं नाही, त्यामुळे त्यांच्याबरोबर नाटक किंवा सिनेमामधून एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही.”

  • 5/8

    यापुढे प्रसाद ओकनं लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनयबद्दल कौतुक करत म्हटलं, “मला लक्ष्मीकांत यांच्याबरोबर काम करता आलं नाही, त्यामुळे कदाचित मी आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेबरोबर काम करीत आहे.”

  • 6/8

    यानंतर प्रसाद म्हणाला, “अभिनय लाघवी, प्रेमळ आणि माणसं जोडणारा आहे. कामाप्रति आदर असलेला अभिनेता आहे. एखादी गोष्ट तो खूप मनापासून करतो. अभिनय सगळ्याच गोष्टींचा मनापासून आनंद घेतो.”

  • 7/8

    कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक पुढे म्हणाला, “लक्ष्मीकांत यांनी अनेक हिट्स सिनेमे दिले आहेत, तशीच आता अभिनयच्याही हिट्स सिनेमांची सुरुवात झाली आहे.” (फोटो : इन्स्टाग्राम)

  • 8/8

    दरम्यान, प्रसाद ओक आणि अभिनय बेर्डे यांचा ‘वडापाव’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनय आणि प्रसादशिवाय या सिनेमात गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, सविता प्रभूणे ही कलाकार मंडळीही आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prasad oak share old memories with laxmikant berde also talk abput his son abhinay work experince ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.