-
हिंदू भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत.
-
कारण, हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे दरवर्षी दिवाळीत भाऊबीजेला मंदिराचे द्वार बंद केले जातात. त्यानंतर मंदिर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्याच्या आसपास उघडलं जातं.
-
यंदा केदारनाथ मंदिराचे द्वार २३ ऑक्टोबरला बंद होणार आहेत. त्याआधी प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी केदारनाथला पोहोचली आहे.
-
यावर्षी अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी असे बरेच मराठी सेलिब्रिटी केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आता नुकतीच प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक सुद्धा केदारनाथला पोहोचली आहे.
-
मंजिरी ओक सध्या तिची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने वाराणसी येथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं.
-
यावर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी मंजिरीने १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रसाद-मंजिरी जोडीने गेले होते.
-
श्रावण महिन्यापासून मंजिरी तिची ही १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत आहे. केदारनाथ यात्रेदरम्यानचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोला मंजिरीने #समाधान असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, मंजिरीने केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक इन्स्टाग्राम )
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
यंदा केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार? त्याआधी लोकप्रिय मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला…
Web Title: Prasad oak wife manjiri oak went to kedarnath dham before temple closing jyotirling yatra photos sva 00