-

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) पुन्हा एकदा तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या (Kedarnath Dham) दर्शनासाठी पोहोचली आहे. तिने आपल्या या आध्यात्मिक प्रवासाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक नेहमीप्रमाणेच साधा; पण लक्षवेधी आहे. तिने लाल रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.
-
साराने आपल्या पोस्टला ‘जय श्री केदार’ (Jai Shree Kedar) असे म्हणत सुरुवात केली आहे. ldयासोबतच तिने हात जोडलेल्या इमोजी आणि इतर धार्मिक इमोजी वापरल्या आहेत, जे तिची भगवान शंकरावरील (Lord Shiva) भक्ती स्पष्ट करतात.
-
कॅप्शनमध्ये साराने केदारनाथबद्दलची तिची खास भावना व्यक्त केली आहे. ती लिहिते, “जगातील एकमेव अशी जागा, जी पूर्णपणे ओळखीची वाटते आणि तरीही प्रत्येक वेळी आश्चर्यचकित करते.”
-
तिने या जागेबद्दल केवळ प्रेमच नाही, तर कृतज्ञताही व्यक्त केली आहे. सारा म्हणते, “फक्त कृतज्ञता! माझ्याकडे असलेले सर्व काही दिल्याबद्दल आणि मी जी आहे, ती मला बनवल्याबद्दल धन्यवाद.”
-
सारा अली खानसाठी केदारनाथचे विशेष महत्त्व आहे. कारण- याच नावाच्या चित्रपटातून (Kedarnath Film) तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे या ठिकाणाशी तिचे भावनिक नाते जुळले आहे.
-
या दौऱ्यात साराने फक्त मंदिरातील केदारनाथाचेच दर्शन घेतले नाही, तर ती स्थानिक लोकांशी बोलताना आणि तेथील ‘घी वाली राजमा’ यासारख्या साध्या पदार्थांची चव घेतानाही दिसली.
-
मुंबईच्या ग्लॅमर आणि धावपळीपासून दूर जात, सारा अली खान वेळोवेळी अशा धार्मिक स्थळांना भेट देऊन स्वतःसाठी आध्यात्मिक शांती शोधताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान/इन्स्टाग्राम)
सारा अली खान पुन्हा ‘भोलेनाथा’च्या चरणी! केदारनाथमधून शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “मी जी आहे…”
अभिनेत्रीचा साधा लूक आणि हृदयाला भिडणारी कॅप्शन व्हायरल; ‘या’ पवित्र स्थळाशी असलेले तिचे भावनिक नाते पुन्हा अधोरेखित.
Web Title: Bollywood actress sara ali khan kedarnath bholenath temple visit spiritual post divine blessings svk 05