-

महानायक अमिताभ बच्चन आपल्या कामाबद्दल किती निष्ठावान आहेत, हे त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत वेळोवेळी सिद्ध केले आहे. तब्बल ८३ वर्षांच्या वयातही ते काम करीत असून ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रावर आपली छाप सोडली आहे.
-
प्रत्येक भूमिकेसाठी त्यांनी मनापासून मेहनत घेतली असून, प्रत्येक पात्राला त्यांनी आपल्या वास्तवदर्शी अभिनयाने जिवंत केले आहे. त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरते.
-
अमिताभ यांच्या या निष्ठेचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा पदार्पणाचा चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’. १९६९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला; मात्र त्याच्याशी संबंधित एक किस्सा आजही लोकांना थक्क करतो.
-
एका मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितले होते की, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी तब्बल सात दिवस आपला चेहरा धुतला नव्हता. त्यांनी ती गोष्ट फक्त आपल्या भूमिकेच्या वास्तवतेसाठी केली होती.
-
दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या या चित्रपटात अमिताभ यांनी बिहारमधील एका मुस्लीम युवक अन्वर अलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी आपल्या लूककडे विशेष लक्ष दिले होते.
-
चित्रपटाचे शूटिंग गोव्यात झाले होते आणि त्या वेळी बजेट खूपच कमी होते. त्या काळातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंधारी जकर हे अमिताभ यांचा मेकअप करीत होते; मात्र काही कारणास्तव त्यांना सात दिवसांनी मुंबईला परतावे लागले.
-
पर्याय नसल्याने अमिताभ यांनी आधी केलेला मेकअप सात दिवस तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांनी चेहऱ्याला पाणीदेखील लावले नाही. जेव्हा पंधारी जकर परत आले, तेव्हा ते अमिताभ यांचा चेहरा पाहून अचंबित झाले.
-
त्यांच्या या समर्पणाने प्रभावित होऊन पंधारी जकर यांनी त्यांना सांगितले, “तू खूप पुढे जाशील. तुझं कामावरचं प्रेम तुला एक दिवस सुपरस्टार बनवेल.” आज त्या भविष्यवाणीप्रमाणेच अमिताभ बच्चन भारतीय सिनेमातील सर्वांत मोठे नाव ठरले आहेत.
पहिल्याच चित्रपटासाठी ७ दिवस चेहरा धुतला नाही! अमिताभ बच्चन यांच्या निष्ठेचा हा ‘थक्क’ करणारा किस्सा!
पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी केलेल्या त्यागामुळेच झाली होती सुपरस्टार होण्याची भविष्यवाणी!
Web Title: Bollywood actor amitabh bachchan dedication and discipline saat hindustani behind the scenes story svk 05