-

लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती तेजस्विनी लोणारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
तेजस्विनी व शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा नुकताच मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. याचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
तेजस्विनी आता राजकीय घराण्याची सून होणार आहे. शिवसेनेचे नेते व माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकरांशी ती लग्नगाठ बांधणार आहे.
-
समाधान सरवणकर हे शिवसेना पक्षाचे युवा नेते आणि माजी नगरसेवक आहेत. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. तिने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील बरेच कलाकार साखरपुड्याला उपस्थित होते.
-
पल्लवी वैद्य, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव असे बरेच कलाकार तेजस्विनीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
-
साखरपुड्याला तेजस्विनीने पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची डिझायनर साडी, गळ्यात सुंदर नेकलेस, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती.
-
आता तेजस्विनी लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
-
दरम्यान, संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीतून सध्या तेजस्विनी व समाधान सरवणकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी इन्स्टाग्राम स्टोरीजचे स्क्रीनशॉट )
सरवणकरांची सून! तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याला पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार, होणारे पती आहेत शिवसेनेचे युवा नेते, जाणून घ्या…
तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांचा पार पडला साखरपुडा, सोहळ्याला मराठी कलाकारांची मांदियाळी, फोटो आले समोर…
Web Title: Tejaswini lonari engagement photos know about her husband samadhan sarvankar shivsena yuva sena leader sva 00