-

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यामध्ये ती जानकी ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
यंदा रेश्मा शिंदेने लग्नानंतर तिची पहिली दिवाळी साजरी केली. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या सासरच्या कुटुंबीयांची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
-
रेश्मा शिंदेचा पती पवन हा साऊथ इंडियन असून, अभिनेत्रीचं सासर बंगळुरुला आहे.
-
अभिनेत्री दिवाळी साजरी करण्यासाठी खास तिच्या सासरी पोहोचली होती. याचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्माची नणंद, अभिनेत्रीचा चिमुकला पुतण्या, सासरेबुवा आणि अन्य कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे.
-
रेश्माची लग्नानंतर पहिली दिवाळी असल्याने तिच्या सासरी खास सेलिब्रेशन करण्यात आलं. रेश्मा व पवन या दोघांनी मिळून एकत्र फटाके सुद्धा फोडले.
-
दिवाळीनिमित्त रेश्माने सुंदर अशी कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. सुंदर साडी, साऊथ इंडियन डिझाइन असलेलं मंगळसूत्र या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर होती.
-
“आमची पहिली दिवाळी” असं कॅप्शन देऊन रेश्माने या पोस्टमध्ये पवनला सुद्धा टॅग केलं आहे.
-
रेश्माने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा आणि पवन यांच्या लग्नाला पुढच्या महिन्यात २९ नोव्हेंबरला १ वर्ष पूर्ण होणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )
‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम जानकीचं खरं कुटुंब पाहिलंत का? रेश्मा शिंदे पोहोचली सासरी, पतीसह ‘अशी’ साजरी केली दिवाळी
रेश्मा शिंदेची लग्नानंतरची पहिली दिवाळी! अभिनेत्री पोहोचली सासरी, शेअर केले सुंदर फोटो, कांजीवरम साडीने वेधलं लक्ष…
Web Title: Marathi actress reshma shinde south indian husband and his family photos of diwali celebration sva 00