-

अमिताभ बच्चन व त्यांचे संपूर्ण कुटुंब अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात चर्चेत आली आहे. त्याचे नेमके कारण काय, ते जाणून घेऊ…
-
नव्याने याआधीही अनेकदा तिला अभिनय क्षेत्रात काम करायचे नाही. तिला उद्योजक बनायचे असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. त्यासाठीच ती सध्या आयआयएम अहमदाबादमध्ये ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट (Blended Post Graduate Programme (BPGP) in Management)चे शिक्षण घेत आहे.
-
नव्याने नुकताच बरखा दत्तशी संवाद साधला. या संवादात तिने एमबीएचे शिक्षण कठीण असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “हा दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. कॅम्पस आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे संमिश्र पद्धतीने शिकवले जाते.”
-
“अर्थात, हे शिक्षण कठीण आहे. ज्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे, विशेषत: आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले आहे, त्यांना माहीत आहे ते किती कठीण आणि आव्हानात्मक आहे.”
-
नव्या पुढे असेही म्हणाली, “जरी शिक्षण कठीण असले तरी पुन्हा एकदा कॉलेजमध्ये जाण्यास मजा येते. एमबीएला प्रवेश घेण्यापूर्वी सहा वर्षे कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा देणे आणि इतर गोष्टींबरोबर मी जुळवून घेत आहे. हा एक उत्तम अनुभव आहे. माझे शिक्षक चांगले आणि अभ्यासक्रमदेखील उत्तम आहे.”
-
तसेच, या सगळ्यात तिला नवीन चांगल्या मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत, ही सगळ्यात चांगली गोष्ट असल्याचे नव्याने कबूल केले. ती म्हणाली, “या संपूर्ण अनुभवात मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटते की, गेल्या वर्षभरात माझी जी मैत्री झाली आहे. माझ्या काही मित्र-मैत्रिणी झाल्या आहेत. मी जितक्या गोष्टी वर्गात शिकते, त्याहून कितीतरी जास्त गोष्टी मी माझ्या वर्गमित्रांकडून, मित्र-मैत्रिणींकडून शिकते. ते माझ्या आयुष्यातील सर्वांत विश्वासू लोक आहेत.”
-
नव्या तिच्या वर्गमित्रांबद्दल अधिक माहिती देत म्हणाली, “माझ्या वर्गातील मुले-मुली आपल्या देशाच्या विविध भागांतील आहेत. विविध क्षेत्रांत काम करणारी, कामाचा अनुभव असणारी, वेगवेगळ्या वयाचे आहेत.”
-
“हा अनुभव माझ्या आयुष्यात मला समृद्ध करणारा असा अनुभव आहे. ते त्यांच्या कामाप्रति समर्पित आहेत, त्यांच्या आजूबाजूला असण्याने अनेक गोष्टी शिकायला मिळतात.”
-
नव्या एकीकडे एमबीएचे शिक्षण घेत आहे आणि दुसरीकडे ती एक उद्योजिकादेखील आहे. ती सामाजिक कार्यकर्तीदेखील आहे. तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. ‘वॉट द हेल नव्या’ असे या चॅनेलचे नाव आहे. (सर्व फोटो सौजन्य: नव्या नवेली नंदा इन्स्टाग्राम)
अमिताभ बच्चन यांची नात ‘या’ क्षेत्रात घेतेय शिक्षण; म्हणाली, “सहा वर्षे…”
Education of Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदाबाबत ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
Web Title: Amitabh bachchans granddaughter navya naveli nanda doing mba from iim ahmedabad opened up about her experience nsp