-

शाहरुख खानचा अमृतमहोत्सवी वाढदिवस २ नोव्हेंबर २०२५ रोजी शाहरुख खान यांनी आपला ६०वा वाढदिवस साजरा केला. ‘बॉलीवूडचा बादशाह’ म्हणून ओळखले जाणारे शाहरुख यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते फक्त सिनेमा नव्हे तर लोकांच्या हृदयाचेही राजा आहेत.
-
चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांपासून ते जगभरातील चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर “#HappyBirthdaySRK” ट्रेंड होत होता.
-
फक्त सुपरहिट चित्रपट नव्हे, तर विचारांचीही ओळख शाहरुख खानची ओळख फक्त त्यांच्या ब्लॉकबस्टर भूमिकांनी नाही, तर त्यांच्या विचारांनी, संस्कारांनी आणि धार्मिक सौहार्दाच्या भावनेनेही बनली आहे.
-
मन्नतमध्ये कुराण आणि गणेश-लक्ष्मी मूर्ती एकत्र शाहरुख यांनी अनेकदा सांगितले आहे की त्याला इस्लामवर श्रद्धा आहे, पण त्यांनी कधीच धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या नाहीत. त्यांच्या ‘मन्नत’ या घरात पूजेच्या ठिकाणी कुराणसोबत गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्तीही ठेवलेल्या आहेत.
-
मुलांना दिला दोन्ही धर्मांचा आदर करण्याचा संस्कार २००४ च्या बीबीसी डॉक्युमेंटरी The Inner World of Shah Rukh Khan मध्ये त्यांनी सांगितले होते, “माझ्या मुलांना देवाची किंमत कळायला हवी, मग तो हिंदू देव असो वा मुस्लिम खुदा.” आर्यन गायत्री मंत्र म्हणतो आणि मी त्याच्यासोबत ‘बिस्मिल्लाह’ म्हणतो असं ते म्हणाले होते.
-
त्यांच्या घरात सर्व सण साजरे होतात शाहरुख यांच्या घरात दिवाळी, ईद आणि ख्रिसमस हे तिन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. “आपण कोणत्याही धर्माचे असलो, तरी सगळ्यांत माणुसकी मोठी आहे,” असं ते सांगतात.
-
“माझी बायको हिंदू, मी मुस्लीम आणि माझी मुलं हिंदुस्तानी” एका रिॲलिटी शोमध्ये शाहरुख म्हणाले होते, “मी कधीच माझ्या मुलांशी धर्माबद्दल बोललो नाही. फॉर्ममध्ये ‘Religion’ लिहायचं असतं तेव्हा मी लिहितो Indian.” हा त्यांचा संवाद सोशल मीडियावर आजही चर्चेत आहे.
-
मुलांच्या नावांतही एकतेचा संदेश शाहरुख यांनी आपल्या मुलांची नावं आर्यन आणि सुहाना अशी ठेवली आहेत, जी कोणत्याही धर्माशी मर्यादित नाहीत. “मी नावं अशी ठेवलीत जी सगळ्यांना आपली वाटतील,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
‘किंग’मध्ये पुन्हा दिसणार बादशाहचा नवा अवतार ६०व्या वाढदिवशी त्यांच्या Red Chillies Entertainment या कंपनीने King या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, यात शाहरुखसोबत सुहाना खान आणि दीपिका पादुकोण झळकणार आहेत. शाहरुखचा सिल्व्हर हेअर लूक चाहत्यांना भुरळ घालतो आहे. (सर्व फोटो सौजन्य : शाहरुख खान/फेसबुक)
शाहरुख खानच्या घरात देवी-देवतांच्या मूर्ती शेजारी कुराण! म्हणाला, ‘माझ्या मुलांना देवाची किंमत कळायला…’
Shah Rukh Khan Birthday: ६०व्या वर्षीही ‘किंग’ कायम! शाहरुख खानचा वाढदिवस झाला धर्म, प्रेम आणि एकतेचा उत्सव
Web Title: Bollywood actor shah rukh khan humanity over religion quran and hindu gods in mannat svk 05