-

अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सावली’ची प्रमुख भूमिका साकारत आहे. तिचे नवे फोटोशूट सध्या चर्चेत आले आहे.
-
प्राप्तीने या फोटोशूटमध्ये गडद मरून (Maroon) रंगाची, पारंपरिक प्रिंट असलेली साडी परिधान केली आहे.
-
ही साडी सुती प्रकारातील असून, त्यावर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या नक्षीचे सुंदर काम केलेले आहे.
-
साडीचा पदर आणि बॉर्डर चंदेरी (Silver) रंगाच्या पट्टीने हायलाइट केलेली आहे, ज्यामुळे लूक खास झालाय.
-
तिने साडीला साजेसा हाफ-स्लीव्ह ब्लाऊज आणि सोबत साधा, बांधलेला अंबाडा (Hair Bun) आहे.
-
प्राप्तीने गळ्यात चांदीच्या रंगाचा बारीक नक्षीकाम केलेला पारंपरिक नेकलेस परिधान केला आहे.
-
हातामध्ये तिने जाड चांदीचे कडे आणि त्यावरचे मोठे ब्रेसलेट घातले आहे, ज्यामुळे तिची पारंपरिकता अधोरेखित होते.
-
नैसर्गिक मेकअप आणि केसांत गजरा घालून केलेल्या मराठमोळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
Photos : ‘केसांत गजरा, चांदीचे दागिने…’ सावलीचा मरून साडीत पारंपरिक अंदाज
पारंपरिक मराठमोळ्या साडीत ‘सावली’ साकारणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरचे मनमोहक सौंदर्य.
Web Title: Marathi actress prapti redkar red saree and oxide jwellery look photoshoot viral svk 05