-

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कामिनी या १९५० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी चेतन आनंद यांच्या १९४६ च्या ‘नीचा नगर’ या चित्रपटातून पदार्पण केले, ज्याने कान्स चित्रपट महोत्सवात पाम डी’ओर पुरस्कार जिंकला होता. (Photo: Express Archive)
-
नदिया के पार (1948), जिद्दी (1948), शबनम (1949), बिराज बहू (1954), जेलर (1958) आणि शहीद (1965) हे त्यांचे खूप गाजलेले चित्रपट होते. (Photo: Express Archive)
-
त्यांनी आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचे काम केले होते. २०१९ च्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात त्यांनी शाहिद कपूरच्या आजीची भूमिका साकारली होती. (Photo: Express Archive)
-
२०१३ मध्ये कामिनी यांनी शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेसमध्येही काम केले होते. (Photo: Express Archive)
-
निधनापर्यंत कामिनी कौशल या सर्वात ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री मानल्या जात होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या वाढत्या वयाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत होत्या. कौशल कुटुंबियांच्या जवळच्या एका सूत्राने त्यांच्या निधनाची बातमी SCREEN ला दिली. (Photo: Express Archive)
-
१९४८ मध्ये आलेल्या ‘शहीद’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल मुख्य अभिनेत्री होत्या. हे फार कमी लोकांना माहिती असेल की, धर्मेंद्र यांनी पाहिलेला हा पहिला चित्रपट होता. १९४८ मध्ये आलेला हा अत्यंत यशस्वी चित्रपट होता. ज्यामध्ये दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांनी अभिनय केला होता. धर्मेंद्र यांच्यासाठी हा चित्रपट प्रेरणास्थान होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर लहान गावात वाढलेल्या धर्मेंद्र यांना अभिनेता बनण्याची इच्छा जागृत झाली. (Photo – Dharmendra/Instagram)
भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
१९४० च्या दशकात कामिनी कौशल या सिनेसृष्टीत शिखरावर होत्या. मात्र त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळे आली होती. जाणून घेऊया त्यांचा प्रवास…
Web Title: Rembering kamini kaushal indias oldest living actress who also had a connection with dharmendra and dilip kumar know how kvg