• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. shiv sena bhavan erected for bappa decoration this ganpati in mumbai is becoming the topic of discussion rno news pvp

Photos : बाप्पाच्या देखाव्यासाठी उभं केलं शिवसेनाभवन; मुंबईतील ‘हा’ गणपती ठरतोय चर्चेचा विषय

शिवसेना भवनामध्ये आत बसलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा या देखाव्यामध्ये दाखवण्यात आली आहे.

September 2, 2022 16:15 IST
Follow Us
  • Shiv Sena Bhavan erected for Bappa decoration
    1/12

    ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण खूपच धुमधडाक्यात साजरा केला जातो.

  • 2/12

    दरम्यान, गणपती बाप्पाच्या अवतीभोवती केली जाणारी सजावटही अगदी विचारपूर्वक केली जाते.

  • 3/12

    अशाच प्रकारे, वरळीतील आदर्श नगरच्या इमारत क्रमांक ३९ मध्ये राहणारं बडे कुटुंब दरवर्षी गणपती बाप्पाचा सुरेख देखावा साकारत असतं.

  • 4/12

    यंदाच्या वर्षी बडे कुटुंबानं मोठी उडी घेत थेट शिवसेना भवन साकारलं आहे.

  • 5/12

    हिंदुत्त्वाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही इमारत १९७४ च्या काळात कशी दिसत होती, तेव्हाचं दादर कसं दिसत होतं, याचा देखावा या कुटुंबाने मर्यादित जागेत साकारला आहे.

  • 6/12

    दुसरीकडे त्यांनी कोहिनूर भवनही साकारलं आहे.

  • 7/12

    शिवसेना भवनाच्या आत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कार्यालय या देखाव्यामध्ये दाखवण्यात आली आहे.

  • 8/12

    त्यांच्या समोरून रस्त्यावरून होणारं गणरायाचं आगमन दाखवण्यात आलंय.

  • 9/12

    शक्य तितकी पर्यावरणपूरक सजावट करत या कुटुंबानं हा देखावा साकारला आहे.

  • 10/12

    सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा देखावा बराच बोलका ठरत आहे.

  • 11/12

    गतकाळातील वास्तू साकारणं, तेसुद्धा काही गोष्टींच्या मर्यादेत राहत फारच आव्हानात्मक असतं. पण, वरळीत ते बडे कुटुंबीयांनी साध्य करून दाखवलंय.

  • 12/12

    दरम्यान, हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. (छायाचित्र सौजन्य – आर एन ओ वृत्तसंस्था)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Shiv sena bhavan erected for bappa decoration this ganpati in mumbai is becoming the topic of discussion rno news pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.