• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. andhericha raja to lalbaugcha raja top 7 famous ganpati bappa pandals across mumbai to visit this ganesh chaturthi 2024 spl

Ganesh Chaturthi 2024: अंधेरीचा राजा ते लालबागचा राजा, मुंबईतील ‘ही’ सात गणेश मंडळं जगभर प्रसिद्ध, बाप्पाच्या दर्शनासाठी होते मोठी गर्दी

Famous Ganpati pandals in Mumbai: गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांचे गणपती पाहण्यासारखे असतात. येथील मंडळांना दरवर्षी हजारो भाविक आणि सेलिब्रिटी भेट देतात. ही मंडळे त्यांच्या भव्यतेसाठी ओळखली जातात. भक्तगण या बाप्पांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात.

September 7, 2024 15:52 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi 2024
    1/10

    गणेश चतुर्थी हा भारतीयांचा एक प्रमुख सण आहे. यंदा ७ सप्टेंबरला म्हणजेच आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. आज देशभरातील घराघरात आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात १० दिवस गणेश उत्सव सुरू राहणार असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून निरोप दिला जाणार आहे. (PTI Photo)

  • 2/10

    दरम्यान, देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण, महाराष्ट्रात या उत्सवाचे सौंदर्य वेगळे आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भव्य गणपती उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाची तयारी उत्सवाच्या अनेक दिवस आधीपासून सुरू होते. गणपतीचे भव्य आणि आगळेवेगळे रूप पाहण्यासाठी लोक दूरवरून महाराष्ट्रात येतात.आज आपण मुंबईतील प्रसिद्ध अशा गणेश मंडळांबद्दल जाणून घेऊयात. (PTI Photo)

  • 3/10

    चिंचपोकळीचा चिंतामणी
    ‘चिंचपोकळी चा चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंडळ १९२० सालापासून या गणपतीची स्थापना करत आहेत. मुंबईतील चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्ग येथे तुम्ही या बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. (Photo Source: @chinchpoklichachintamani/instagram)

  • 4/10

    गिरगावचा राजा
    ‘गिरगाव चा राजा’ या गणपतीची स्थापना १९२८ सालापासून केली जाते. मुंबईतील गिरगाव येथील एस.व्ही.सोवनी मार्ग येथील हे मंडळ अतिशय प्रसिद्ध आहे. (Photo Source: @girgaoncharaja/instagram)

  • 5/10

    लालबागचा राजा
    मुंबईतील लालबागचा राजा हे मंडळ १९३४ पासून अविरतपणे लालबाग मार्केट, जीडी गोएंका रोड, मुंबई येथे भव्य बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करते. (PTI Photo)

  • 6/10

    GSB गणपती
    १९५५ पासून कटक रोड, वडाळा, मुंबई येथील द्वारकानाथ भवन येथे भव्य गणपती उत्सव आयोजित केला जातो. हा गणेशोत्सव जीएसबी सेवा मंडळाकडून आयोजित केला जातो. ‘गोल्ड गणेश’ या नावानेही येथील बाप्पा प्रसिद्ध आहे. (PTI Photo)

  • 7/10

    खेतवाडीचा राजा
    ‘खेतवाडीचा राजा’ नावाचे मंडळ १९५९ पासून दरवर्षी मुंबईतील ग्रँट रोड, खंबाळा गल्लीमध्ये गणपती उत्सव साजरा करत असते. या मंडळाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील बाप्पााच्या मूर्तीचा आकार १९५९ पासून एकसारखाच ठेवला जातो. (Photo Source: @khetwadicharaja/instagram)

  • 8/10

    अंधेरीचा राजा
    मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे ‘अंधेरीचा राजा’ नावाचे गणेश मंडळ हा गणपती उत्सव आयोजित करते. येथे १९६६ पासून गणपती मूर्तीची स्थापना केली जाते. (Photo Source: @andhericharajatm/instagram)

  • 9/10

    फोर्टचा इच्छापूर्ती गणेश
    मुंबईतील फोर्टमधील कबूतरखान्याजवळ ‘फोर्टचा इच्छापूर्ती गणेश’ या नावाने प्रसिद्ध असलेले गणेश मंडळ आहे. १९८२ पासून येथे भव्य गणेशोत्सव आयोजित केला जातो. (Photo Source: @fortchaicchapurti/instagram)

  • 10/10

    हेही वाचा: Ganeshostav 2024: गणपती बाप्पा मोरया!, ‘या’ मराठी सिनेकलाकारांच्या घरी वाजत गाजत झाले

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: Andhericha raja to lalbaugcha raja top 7 famous ganpati bappa pandals across mumbai to visit this ganesh chaturthi 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.