Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. making modak for beloved bappa know the benefits of modka from experts snk

बाप्पाला आवडतात उकडीचे मोदक! तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे

Benfits of Ukdiche Modak : मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

September 17, 2024 14:52 IST
Follow Us
  • Making modak for beloved bappa know the benefits of modka from experts
    1/21

    गणरायाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक तयार करण्यासाठी गृहिणींची तयारी सुरू झाली आहे, तर खवय्यांनादेखील केव्हा एकदा उकडीचे मोदक खायला मिळतील असे झाले आहे.

  • 2/21

    बाप्पाचे आवडते मोदक भक्तगणांचा देखील आवडीचा पदार्थ! गणेशोत्सवात प्रत्येक घरात आवर्जून उकडीचे मोदक बनवले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  सर्व जण उकडीचे मोदक आवडीने खातात. 

  • 3/21

     मोदक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?किंबहुना मोदक आरोग्यदायी प्रसाद आहे हे जाणून तुम्हाला आनंदच होईल! चला तर मग जाणून घेऊ या मोदकाचे फायदे!रतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी मोदक खाण्याने आपल्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत लोकसत्ताला सविस्तर माहिती दिली आहे. पल्लवी सांगतात की, “मोदकामुळे आपल्याला कधीही पचनाचे काही त्रास होत नाहीत, कारण त्यात खूप तेल किंवा साखर आहे असे नसते, त्यामध्ये ठराविक प्रमाणात खोबरे आणि गूळ वापरले जाते.  

  • 4/21

    आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी मोदक खाण्याने आपल्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत लोकसत्ताला सविस्तर माहिती दिली आहे.पल्लवी  सांगतात की, “मोदकामुळे आपल्याला कधीही पचनाचे काही त्रास होत नाहीत, कारण त्यात खूप तेल किंवा साखर आहे असे नसते, त्यामध्ये ठराविक प्रमाणात खोबरे आणि गूळ वापरले जाते

  • 5/21

    पारंपरिक पद्धतीनुसार मोदक उकडीचे असतात  , त्यामुळे ते पचनासाठी चांगले आहेत. तळणीपेक्षा उकडीचे मोदक खाणे आरोग्यासाठी पूरक आहेत.  मोदक हा स्वतंत्रपणे  खाण्याचा पदार्थ आहे. आपण नेहमी जेवणांनंतर मोदकावर ताव मारतो मात्र त्यापेक्षा थोडा वेळ घेऊन मोदकाचे सेवन केल्यास उत्तम!  

  • 6/21

    मोदकांमधील पोषक घटक
    ऊर्जा : मोदकामध्ये कॅलरीचे (ऊर्जेचे )प्रमाण जास्त आहे. एका मोदकामध्ये साधारण २५० कॅलरीज असतात. मोदकाचे सारण खोबरे , गूळ या पदार्थानी बनते आणि  सारण तयार करताना त्यात तेल किंवा तूप वापरले जाते. 

  • 7/21

    ऊर्जेने भरपूर असणाऱ्या या पदार्थांमुळे एका  मोदकाच्या सेवनामुळे देखील मोठ्या प्रमाणात शरीराला ऊर्जा मिळते. एका मोदकामध्ये ९ ते १० ग्रॅम फॅट्स आहेत, ६० ते ७० ग्रॅम कार्बोहायड्रेटस आहेत आणि ३ ते ४ ग्रॅम प्रथिने आहेत. 

  • 8/21

    एका जेवणामध्ये जितक्या कॅलरीज असणे आवश्यक आहे, त्यातील अर्ध्या कॅलरीज आपल्याला एका मोदकातूनच मिळतात.

  • 9/21

    मोदक तयार करताना त्यामध्ये तांदळाचे पीठ, खोबरं आणि गूळ हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात. त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घ्या.
    तांदूळ
    तांदळाच्या पीठामध्ये व्हिटॅमिन बी १ असते जे आरोग्यासाठी चांगले असते. विशेषत: महिलांना मासिक पाळीमुळे होत असलेल्या वेदना कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी १ मदत करते.

  • 10/21

    गूळ :
    सारण तयार करताना वापरला जाणारा गूळ लोह वर्धक आणि पचनासाठी उत्तम आहे. गूळ ऊर्जादायक आहेच शिवाय रक्त शुद्धीकरणासाठी देखील उपयुक्त आहे.

  • 11/21

    खोबरं: 
    मोदकामध्ये वापरलं जाणारं खोबरं हे सहसा ओलं खोबरं असतं, ज्यामध्ये चांगल्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात आणि खनिजे देखील असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

  • 12/21

    तूप: 
    जेव्हा गोड पदार्थांचे सेवन केले जाते तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेवर होणारा परिणाम मोजणे आवश्यक असते. त्यामुळे जेव्हा आपण मोदकावर तूप टाकतो तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण तुलनेने नियंत्रित होते. 

  • 13/21

    वेलची
    काही लोक मोदकामध्ये वेलची पूड वापरतात जे अत्यंत चांगले असते, कारण वेलची ही पोटाच्या आरोग्यासाठी चांगली असते. तसेच वेलचीपूड रक्तातील शर्करेवर सुद्धा नियंत्रण ठेवते . 

  • 14/21

    मोदकाचे आरोग्यासाठी फायदे
    मोदक हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स ने  समृद्ध असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

  • 15/21

    सांध्याच्या आरोग्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी मोदक हा खूप चांगला गोड पदार्थ आहे.

  • 16/21

    मोदकामध्ये चांगले कोलेस्ट्रॉलदेखील असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

  • 17/21

    मोदकामध्ये ब्युटिरिक ऍसिड शरीरातील दाहकता कमी करते.

  • 18/21

    ऊर्जेने भरपूर असणारे मोदक वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी पोषक पर्याय आहे .ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी मात्र मोदकाचे अति सेवन टाळावे

  • 19/21

    तळणीचे मोदक आणि उकडीचे मोदक
    गव्हाचा वापर आपल्या आहारात खूप उशिरा सुरू झाला, त्यामुळे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार तांदळाच्या पीठापासून उकडीचे मोदक बनवले जातात.

  • 20/21

    तळणीच्या मोदकांबाबत सांगायचे झाले तर कोणत्याही तळलेल्या पदार्थांमध्ये तितके पोषणमूल्य राहत नाही..

  • 21/21

    पेढे किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा मोदक हा खूप चांगला पदार्थ आहे, जो आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो.(सर्व फोटो – शरयू काकडे/ लोकसत्ता)

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Making modak for beloved bappa know the benefits of modka from experts snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.