-
मराठी अभिनेत्री अनघा अतुल भगरेच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, घरभर आनंदाचे वातावरण पसरले आहे.
-
फुलांनी सजवलेला गणेशमंडप, रंगीबेरंगी हार व दिव्यांच्या प्रकाशाने गणेश आरास अधिक आकर्षक दिसते.
-
गणरायाच्या मूर्तीला पारंपरिक दागदागिने, ताज्या फुलांचे हार आणि लाल-गुलाबी फुलांनी सजवले आहे.
-
बाप्पांसमोर नैवेद्य, फळे, सुका मेवा आणि पूजेची थाळी ठेवून पूजा-अर्चा करण्यात आली.
-
अनघाने या प्रसंगी निळ्या रंगाची रेशमी साडी परिधान केली असून, तिचा पारंपरिक लूक चाहत्यांना भावतोय.
-
केसांमध्ये गजरा, चेहऱ्यावर हसरा भाव आणि खास नथ या सर्वांमुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसतेय.
-
तिच्या घरातील महिलाही पारंपरिक पेहरावात सहभागी होताना दिसल्या आणि वातावरण अधिक मंगलमय झाले.
-
‘बाप्पा आले’, अशी भावनिक कॅप्शन देत अनघाने हा आनंदाचा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. (सर्व फोटो सौजन्य: अनघा अतुल भगरे/ इंस्टाग्राम)
Photos : अनघा अतुल भगरेच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष; सजावट व पारंपरिक लूकची जोरदार चर्चा
Ganesh chaturthi 2025 : फुलांची सजावट, सुंदर आरास व अनघाचा भावपूर्ण अंदाज सोशल मीडियावर चर्चेत
Web Title: Marathi actress anagha atul baghre ganpati celebration blue saree look photos svk 05