-
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी यंदाही गणेशोत्सवाची रंगत खुलली आहे. घरात आकर्षक सजावट आणि पारंपरिक उत्साहाने बाप्पाचे स्वागत करण्यात आले.
-
निळ्या, पांढऱ्या व केशरी फुलांनी सजवलेला मंडप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
अमित ठाकरे कुटुंबीयांनी पारंपरिक वेशभूषेत बाप्पाचे दर्शन घेतले. मिताली ठाकरे यांच्या पारंपरिक साडीमधल्या लूकने विशेष आकर्षण निर्माण केले.
-
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबाने एकत्र येत भक्तिमय क्षण साजरे केले.
-
शिवतीर्थावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. (फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे/इन्स्टाग्राम)
-
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावरून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत हे फोटो शेअर केले आहेत.
-
अमित ठाकरे यांचा मुलगा किआन ठाकरे यानेही बाप्पाच्या दर्शनात सहभाग घेतला. त्याच्या निरागस हास्य आणि उपस्थितीने गणेशोत्सवाला वेगळेच उबदार वातावरण लाभले.
-
शिवतीर्थावरचा हा पारंपरिक गणेशोत्सव श्रद्धा, भक्ती व आनंदाचा संगम ठरला आहे. ठाकरे कुटुंबीयांसह बाप्पाच्या स्वागताचा हा सोहळा चाहत्यांनाही भावून गेला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमित ठाकरे व मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)
शिवतीर्थावरील गणेशोत्सवात अमित ठाकरे व मिताली ठाकरे यांच्या पारंपरिक लूकची चर्चा
Ganeshotsav 2025 : गणरायाच्या आगमनाने शिवतीर्थावर उत्साहाचे वातावरण
Web Title: Maharashtra navnirman sena leader amit thackeray and wife mitali thackeray ganpati photoshoot svk 05