Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. lalbaugcha raja to mumbaicha raja must visit 11 ganesh pandals in mumbai how to reach spl

लालबागचा राजा ते राजा तेजुकायाचा; मुंबईतील ११ प्रसिद्ध गणपती, काय आहे खासीयत, कसे पोहोचाल?

मुंबईमध्ये अनेक असे मंडळं आहेत ज्यांच्या गणेशमुर्ती अतिशय भव्य असतात. या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या तिथे संख्येनं हजेरी लावत असतात.

Updated: August 29, 2025 14:49 IST
Follow Us
  • Lord Ganesha Tusks Story
    1/12

    सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. मुंबईतले गणपती हा प्रत्येकासाठी आकर्षाणाचा विषय असतो. मुंबईमध्ये अनेक असे मंडळं आहेत ज्यांच्या गणेशमुर्ती अतिशय भव्य असतात. या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या तिथे संख्येनं हजेरी लावत असतात. आज आपण अशाच काही अशाच काही मंडळांबद्दल जाणून घेऊयात ज्यांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

  • 2/12

    लालबागचा राजा (परळ)
    नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालगाबचा राजा, यंदाचं ९२ वं वर्ष.
    लोअर परळ / करी रोड स्टेशनवरुन तिथे पोहोचता येतं.

  • 3/12

    मुंबईचा राजा, गणेश गल्ली (लालबाग)
    लालबागच्या राजाच्या जवळचं असलेला गणेश गल्लीचा मुंबईतला राजा दरवर्षी विविध भव्य थीम वर आधारीत देखावे करण्यासाठी प्रसिद्ध आहे.लालबागच्या राजापासून चालत जाता येते.

  • 4/12

    जीएसबी सेवा मंडळ (माटुंगा)
    मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी गणपती. १९५४ मध्ये पहिल्यांदा या गणपतीची स्थापना झाली.
    पोहोचण्याचा मार्ग – माटुंगा / किंग्ज सर्कल स्टेशन.

  • 5/12

    खेतवाडीचा राजा (गिरगाव)
    मुंबईतील सर्वात उंच गणपतीची मूर्ती ही खेतवाडीच्या राजाची असते. (३५-४० फूट) या मंडळपरिसरात खूप गर्दी असते.
    पोहोचण्याचा मार्ग- ग्रँट रोड स्टेशन.

  • 6/12

    चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी)
    १९२० मध्ये या बाप्पाची सुरूवात झाली. हे मंडळही सर्वात जुन्या मंडळांपैकी एक आहे. लाखो भाविकांसाठी आकर्षणाचा विषय.
    पोहोचण्याचा मार्ग- चिंचपोकळी स्टेशन.

  • 7/12

    गिरवगाचा राजा (गिरगाव)
    मुंबईचा पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपणारे मंडळ तसेच पर्यावरणपूरक मूर्तीसाठी प्रसिद्ध.
    पोहोचण्याचा मार्ग- चर्नी रोड स्टेशन.

  • 8/12

    अंधेरीचा राजा (अंधेरी पश्चिम)
    इच्छा पूर्ण करणारा नवसाचा राजा म्हणूनही अंधेरीचा राजा प्रसिद्ध आहे. पाहोचण्याचा मार्ग- अंधेरी स्टेशन, आझाद नगर.

  • 9/12

    केशवजी नाईक चाळ (गिरगाव)
    मुंबईतील पहिला सार्वजनिक गणपती, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लोकांना एकत्र करण्यासाठी १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केला.पाहोचण्याचा मार्ग- चर्नी रोड स्टेशन

  • 10/12

    सह्याद्री क्रीडा_मंडळ (टिळक नगर, चेंबूर)
    प्रचंड उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध, दरवर्षी स्थानिकांची मोठी गर्दी असते.
    पाहोचण्याचा मार्ग- चेंबूर स्टेशन, टिळक नगर.

  • 11/12

    कॉटन ग्रीन चा राजा (काला चौकी)
    अद्वितीय सर्जनशील सजावटींसाठी लोकप्रिय पाहोचण्याचा मार्ग- भायखळा / कॉटन ग्रीन स्टेशन.

  • 12/12

    तेजुकायाचा राजा (परळ)
    सर्वात उंच पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा जागतिक विक्रम या मंडळाच्या नावावर आहे, इथेही दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात.
    पाहोचण्याचा मार्ग- लोअर परळ स्टेशन. (सर्व फोटो साभार- सावे टूर्स इन्स्टाग्राम पेज) हेही पाहा- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण किती?

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी प्रसादGanesh Chaturthi Prasadगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Lalbaugcha raja to mumbaicha raja must visit 11 ganesh pandals in mumbai how to reach spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.