• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health benefits of eating corn in monsoon season scsg

केवळ टाइमपास नाही तर आरोग्यवर्धकही… जाणून घ्या पावसाळ्यात मक्याची कणसं खाण्याचे फायदे

धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो किंवा पावसाळ्यातील थिंग्स टू डू यादीतील गोष्ट असते.

June 28, 2021 19:33 IST
Follow Us
  • health benefits of eating corn in monsoon season
    1/11

    पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची संख्या नेहमीपेक्षा जरा जास्तच दिसू लागते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात तर पर्यटनस्थळी मक्याची कणसं विकाणारे हमखास सापडतात.

  • 2/11

    धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते.

  • 3/11

    परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणसं सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे अनेक गृहिणी त्यापासून विविध पदार्थ करताना दिसतात.

  • 4/11

    विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये ही कणसं खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे चला तर मग आज जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे काही फायदे.

  • 5/11

    १. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खासकरुन वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आजकाल बाजारात या कणिसांचे दाणे सोलूनदेखील मिळतात.

  • 6/11

    २. मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणे उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.

  • 7/11

    ३. मका हे एक धान्य असून त्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.

  • 8/11

    ४. मक्याच्या सेवनामुळे वाढत्या वयाच्या खूणा कमी होतात.

  • 9/11

    ५. मक्यात असलेल्या फॉलिक अॅसिडमुळे कर्करोगाचा धोका कमी असतो.

  • 10/11

    ६. मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.

  • 11/11

    ७. मक्याच्या पिठापासून तयार केलेली पोळीदेखील शरीरासाठी फायदेशीर आहे.

TOPICS
मान्सून अपडेटMonsoon Updateलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Health benefits of eating corn in monsoon season scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.