• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. top 5 cng cars in india below 6 lakh gst

‘या’ आहेत भारतातील टॉप ५ CNG गाड्या; किंमत आहे ६ लाखांच्या आत

भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल आता बदलला आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊयात भारतातील ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम CNG गाड्यांची माहिती

July 31, 2021 14:23 IST
Follow Us
  • इंधनाच्या चढ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडतं. दरांत सतत होणाऱ्या चढ-उतारांमुळे दर काही दिवसांनी खिशाला मोठी कात्री लागते. याच पार्श्वभूमीवर, कित्येक भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल बदलला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, सीएनजी कार या सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी परवडणाऱ्या आणि लो मेंटेनन्स असतात. म्हणूनच, आम्ही तुम्हाला आज ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम सीएनजी गाड्यांची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या ६ लाखांच्या आत आहेत.
    1/11

    इंधनाच्या चढ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडतं. दरांत सतत होणाऱ्या चढ-उतारांमुळे दर काही दिवसांनी खिशाला मोठी कात्री लागते. याच पार्श्वभूमीवर, कित्येक भारतीय ग्राहकांचा सीएनजी गाड्यांकडे पाहण्याचा कल बदलला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, सीएनजी कार या सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी परवडणाऱ्या आणि लो मेंटेनन्स असतात. म्हणूनच, आम्ही तुम्हाला आज ५ सर्वोत्तम इंधन-कार्यक्षम सीएनजी गाड्यांची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या ६ लाखांच्या आत आहेत.

  • मारुती सुझुकी वॅगनआर : मारुती सुझुकी वॅगनआर ही आज देशात उपलब्ध सर्वात यशस्वी सीएनजी कार आहे. ३३.५४ किमी/किग्रॅ मायलेज देणारी ही सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम कार आहे. वॅगनआर एस-सीएनजी ही एलएक्सआय (LXi) आणि एलएक्सआय (ओ) [LXi (O)] या २ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. (Photo : http://www.marutisuzuki.com)
  • एलएक्सआय व्हेरिएंटची किंमत ५.४५ लाख आहे. तर एलएक्सआय (ओ) व्हेरिएंटची किंमत ५.५२ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या कारची इंधन कार्यक्षमता: ३२.५२ किमी/किग्रॅ इतकी आहे. तर किंमत ५.४५ लाखांपासून ५.५२ लाखांपर्यंत आहे. (Photo : CarDekho)
  • मारुती सुझुकी अल्टो : मारुती सुझुकी अल्टो ही एंट्री-लेव्हल कार अगदी खिशाला परवडण्याजोगी आणि लो मेंटेनन्स कर म्हणून प्रसिद्ध आहे. ही कार मायलेजच्या बाबतीत सर्वात किफायतशीर आहे. या कारच्या निर्मात्याचा असा दावा आहे की ही सीएनजी गाडी ३१.५९ किमी/किग्रॅचे मायलेज देऊ शकते. (Photo : http://www.marutisuzuki.com)
  • मारुती सुझुकी अल्टो सीएनजी एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) या दोन व्हेरिएंट्स उपलब्ध आहे. या कारची इंधन कार्यक्षमता ३१.५९ किमी/किग्रॅ इतकी आहे. तर किंमत ४.४३ लाखांपासून ४.४८ लाखांपर्यंत आहे. (Photo : Indian Express)
  • मारुती सुझुकी एस-प्रेसो : मारुती सुझुकी इंडियाने काल एस-प्रेसोचे सीएनजी डेरिव्हेटीव्ह लाँच केलं. ही कार पुढील ४ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत – एलएक्सआय, एलएक्सआय(ओ), विएक्सआय आणि विएक्सआय (ओ). बेस एलएक्सआय व्हीरिएंटची किंमत ४.८९ लाखांपासून सुरू होते. तर टॉप-एंड विएक्सआय (ओ) व्हर्जनची किंमत ₹ ५.१८ लाखांपर्यंत जाते. (Photo : http://www.marutisuzuki.com)
  • एस-प्रेसो सीएनजी ही अल्टो के १० कडून घेतलेल्या १.० लिटर पेट्रोल इंजिनद्वारे चालविली जाते. कार ३१.२ किमी/किग्रॅची (एआरए क्षेत्र) प्रभावी इंधन कार्यक्षमता देते. तर किंमत – ₹ ४.८९ लाखांपासून ₹ ५.१८ लाखांपर्यंत आहे. (Photo : Indian Express)
  • ह्युंदाई सँट्रो : जर तुम्ही सीएनजीवर चालणाऱ्या आकर्षक कारच्या शोधात असाल तर ह्युंदाई सँट्रो हा एक उत्तम पर्याय आहे. ही मॅग्ना आणि स्पोर्ट्झ या २ व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या गाडीची किंमत ५.८६ लाखांपासूनआणि ५.९९ लाखांपर्यंत (एक्स -शोरूम दिल्ली) आहे.
  • 2/11

    बोनटमध्ये, हॅचबॅकच्या सीएनजी डेरिव्हेटिव्हला १.१-लीटर, ४-सिलेंडर इंजिन मिळते.कार निर्मात्याचा दावा आहे की कार ३०.४८ किमी/किलोमीटर (एआरएआय) मायलेज देऊ शकते. या कारची इंधन कार्यक्षमता ३०.४८ किमी/किग्रॅ तर किंमत ₹ ५.८६ लाखांपासून ₹ ५.९९ लाखांपर्यंत आहे. (Photo : Indian Express)

  • मारुती सुझुकी सेलेरियो : गेल्या वर्षी भारतात सेलेरियो सीएनजीची बीएस ६ आवृत्ती लाँच करण्यात आली होती. जी 'मिशन ग्रीन मिलियन' ब्रँडच्या दृष्टीकोनाशी सुसंगत होती. सध्या, हॅचबॅकचं हे सीएनजी व्हर्जन व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय (ओ) या २ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.  (Photo : Indian Express)
  • आधीची किंमत ₹ ५.७२ लाख, नंतरची किंमत ₹ ५.७८ लाख (एक्स-शोरूम) आहे. ही कार ३०.४७ किमी/किलो (ARAI) चे मायलेज देते. (Photo : http://www.marutisuzuki.com)
TOPICS
कारCarमारुती सुझुकीMaruti SuzukiसीएनजीCNGह्युंदाईHyundai

Web Title: Top 5 cng cars in india below 6 lakh gst

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.