• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. production of bmw first electric scooter begins rmt

Photo: BMW च्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू, पूर्ण चार्ज झाल्यावर धावते १३० किमी

जर्मन टू व्हिलर निर्माती कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज झाली आहे.

November 23, 2021 12:50 IST
Follow Us
  • बीएमडब्ल्यू कंपनीच्या लक्झरी कारप्रमाणेत मोटारसायकलींनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे. आता जर्मन टू व्हिलर निर्माती कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज झाली आहे. (Photo- bmw motorcycles)
    1/11

    बीएमडब्ल्यू कंपनीच्या लक्झरी कारप्रमाणेत मोटारसायकलींनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे. आता जर्मन टू व्हिलर निर्माती कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज झाली आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 2/11

    वर्ष २०२० मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचं संकल्पना मॉडेल सादर केलं होतं. कंपनीने या वर्षी जुलैमध्ये अधिकृतपणे आपली सर्व-इलेक्ट्रिक स्कूटर बीएमडब्ल्यू CE 04 सादर केली. आता दुचाकी ब्रँडने या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू केले आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 3/11

    बीएमडब्ल्यू CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर आकर्षक आहे. इलेक्ट्रिक स्कूटर साय-फाय भविष्यवादी चित्रपटातील स्कूटरसारखी दिसते. (Photo- bmw motorcycles)

  • 4/11

    बीएमडब्ल्यू मोटरराडने इलेक्ट्रिक आणि शहरी भागातील गरज पाहता एक पाऊल पुढे टाकलं आहे. २०१७ साली कंपनीने पहिल्यांदा या दिशेने पाऊल उचललं होतं. (Photo- bmw motorcycles)

  • 5/11

    बीएमडब्ल्यू CE-04 इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना यामाह XMAX, बीएमडब्ल्यू C400 सारख्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरशी केली जाण्याची शक्यता आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 6/11

    स्कूटरला हलक्या पांढर्‍या रंगाचे आधुनिक सरफेस फिनिश मिळते, जे ‘फ्लोटिंग’ सीटसह समोर आणि बाजूला मॅट ब्लॅक सेक्शनसह येते. यात लांब साइड प्रोफाइल आहे आणि ट्रेंड-सेटिंग व्हीलमध्ये डिस्क-व्हील लूक आणि साइड स्टँड आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 7/11

    मॅगेलन ग्रे मेटॅलिक कलर बॉडी, ब्लॅक/ऑरेंज सीट्स, ऑरेंज विंड डिफ्लेक्टर आणि अनेक ग्राफिक्स आहेत. (Photo- bmw motorcycles)

  • 8/11

    बीएमडब्ल्यू CE-04 Standard आणि Avantgarde व्हेरियंटमध्ये आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 9/11

    इलेक्ट्रिक स्कूटर ३१ kW (४२ hp) ची कमाल उर्जा निर्माण करते. ही स्कूटर केवळ २.६ सेकंदात ० ते ५० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. तसेच टॉप स्पीड १२० किलोमीटर प्रति तास आहे. (Photo- bmw motorcycles)

  • 10/11

    स्कूटरमध्ये ८.९ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी आहे. बॅटरी फ्लोअरबोर्डच्या आत बसवली आहे. एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर १३० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. त्याची बॅटरी खूप लवकर चार्ज होते. ६.९ किलोवॅट चार्जरच्या मदतीने केवळ १ तास ४० मिनिटांत बॅटरी पूर्ण चार्ज होते. (Photo- bmw motorcycles)

  • 11/11

    हे मॉडेल २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. BMW CE 04 च्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे रु. ८.७८ लाख असणे अपेक्षित आहे. BMW Motorrad ही स्कूटर भारतीय बाजारात आणेल की नाही याबाबत स्पष्टता नाही. (Photo- bmw motorcycles)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Production of bmw first electric scooter begins rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.