-
दक्षिण कोरियातील आघाडीची वाहन निर्माण करणारी कंपनी ह्युंदई इंडियाने गुप्तपणे देशातील Alcazar SUV मॉडेलमध्ये एक नवीन व्हेरियंट आणलं आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लीक झालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे. Hyundai Alcazar Signature (O) 7-सीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत २४.९६ लाख रुपये आहे. (फोटो : hyundai.com)
-
एसयूव्हीच्या नवीन टॉप अँड व्हेरियंट सिग्नेचर (O) ट्रिममध्ये आढळणाऱ्या सर्व फिचर्ससह येते. यात १८-इंच डायमंड-कट अलॉय व्हील, साइड फूट स्टेप्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी सपोर्ट करणारा १०.२५ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स (बर्फ, वाळू, चिखल), ड्राइव्ह मोड्स (कम्फर्ट, इको, स्पोर्ट), एअर प्युरिफायर, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, बोस ऑडिओ सिस्टम , पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि अनेक फिचर्स आहेत. (फोटो : hyundai.com)
-
Hyundai Alcazar Signature (O) 7-सीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट २.०लिटर, ४ सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरलं गेलं आहे. हे इंजिन १५९ बीएचपी पॉवर आणि १९२ एनएम टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही १.५ लीटर, ४ सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनसह येते. ते ११५ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक युनिट समाविष्ट आहेत. (फोटो : hyundai.com)
-
पेट्रोल मॅन्युअल प्रकार १४.५ किमी प्रति लिटर आणि पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट १४.२ किमी प्रति लिटरचा एव्हरेज देत असल्याचा दावा आहे. तर डिझेल मॉडेल मॅन्युअल गिअरबॉक्ससह २०.४ किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १८.१ किमी प्रति लिटर एव्हरेज देते. (फोटो : hyundai.com)
-
Hyundai Alcazar च्या किमती सध्या १६.३० लाख पासून सुरू होतात आणि २०.१४ लाखांपर्यंत जातात. जिथे पेट्रोल मॉडेलची किंमत १६.३० लाख ते १९.९९ लाख रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल मॉडेलची किंमत १६.५३ लाख ते २०.१४ लाख रुपये आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत १७.९३ लाख ते २०.१४ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. (फोटो : hyundai.com)
Photo: ह्युंदईची अलकाजार ७ सीटर पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरियंट लॉन्च; किंमत आणि फिचर्स जाणून घ्या
ह्युंदई इंडियाने गुप्तपणे देशातील Alcazar SUV मॉडेलमध्ये एक नवीन व्हेरियंट आणलं आहे.
Web Title: Hyundai launches alcazar 7 seater petrol automatic variant rmt