• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. add these foods in your diet during periods you will get relief from pain scsm

Health Tips for Women: मासिक पाळीत ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

April 23, 2022 15:27 IST
Follow Us
  • मासिक पाळीत महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यादरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, मूड बदलणे, शरीर दुखणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
    1/9

    मासिक पाळीत महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यादरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, मूड बदलणे, शरीर दुखणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

  • 2/9

    या दरम्यान महिलांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

  • 3/9

    शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्या. मासिक पाळी दरम्यान हायड्रेटेड राहिल्याने निर्जलीकरणामुळे डोकेदुखी होण्याची शक्यता कमी होऊ शकते. यामुळे सूज येणे देखील टाळता येते.

  • 4/9

    टरबूज इत्यादी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा. अशी फळे खाल्ल्याने तुम्ही हायड्रेट राहाल.

  • 5/9

    पीरियड्समध्ये जास्त पोट फुगणाच्या समस्या निर्माण होतात. कारण यावेळी शरीरात लोहाची कमतरता असते. म्हणून, लोहाची पातळी राखण्यासाठी भरपूर हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक आहे कारण लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे आणि शरीर दुखणे होऊ शकते.

  • 6/9

    डार्क चॉकलेट हा लोह आणि मॅग्नेशियम समृद्ध एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. मॅग्नेशियम पीएमएसची लक्षणे कमी करण्यास मदत करते.

  • 7/9

    आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे मासिक पाळी दरम्यान स्नायू वेदना कमी करण्यास मदत करते. आले मळमळ आणि उलट्या कमी करण्यास देखील मदत करते. याचे जास्त प्रमाणात सेवन करणे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • 8/9

    नट्स हे ओमेगा ३ फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असतात. ते प्रथिने, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे यांचे चांगले स्रोत आहेत. नट्स खाल्ल्याने लोहाची पातळी राखण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

  • 9/9

    पीरियड्समध्ये भरपूर फायबर असलेले पदार्थ खावेत. यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते. तुम्ही न्याहारी किंवा रात्रीच्या जेवणात गव्हाची लापसी आणि बाजरीचे सेवन करू शकता. त्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. (all photos: indian express)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Add these foods in your diet during periods you will get relief from pain scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.