Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 5 ways to take care of your cng car in summer heat ttg

CNG Car Tips: उन्हाळ्यात तुमच्या सीएनजी कारची ‘अशी’ घ्या काळजी; लक्षात ठेवा ‘या’ पाच गोष्टी

तुमच्याकडे सीएनजी कार असेल तर, या कडक उन्हात कारची कशी काळजी घ्यायची हे जाणून घ्या.

April 30, 2022 12:16 IST
Follow Us
  • CNG Car Tips: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच सीएनजीचा अवलंब करणार्‍या वाहनांच्या संख्येत वाढ होऊन त्यांचा खिशातून होणारा खर्च कमी झाला आहे. ( फोटो: PTI)
    1/9

    CNG Car Tips: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच सीएनजीचा अवलंब करणार्‍या वाहनांच्या संख्येत वाढ होऊन त्यांचा खिशातून होणारा खर्च कमी झाला आहे. ( फोटो: PTI)

  • 2/9

    या सीएनजी कारची उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे घरजेचे आहे. सीएनजी वाहन नेहमीच सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या पाच उपयुक्त टिप्स लक्षात घ्या. ( फोटो: Indian Express)

  • 3/9

    सीएनजी नसलेल्या वाहनांप्रमाणे, शक्यतोवर, सीएनजी वाहनही सावलीत उभी करणे महत्त्वाचे आहे. कडक उन्हामुळे कारच्या केबिनचे तापमान आणखी वाढू शकते. अशा स्थितीत दिवसाच्या बहुतांश भागात कार जास्त वेळ उभी राहिल्यास ती सावलीच्या ठिकाणी पार्क करावी. (फोटो: Maruti Suzuki India)

  • 4/9

    कारमध्ये सिलिंडरच्या कमाल मर्यादेपर्यंत सीएनजी न भरण्याचा प्रयत्न करा. उष्ण हवामानात थर्मल विस्तारामुळे असा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, जर वाहनाच्या सिलिंडरची रिफिल क्षमता आठ लिटर असेल, तर अटेंडंटला सीएनजी भरताना फक्त सात लिटर भरण्यास सांगा. कार सीएनजी संपल्यास काय होईल याची काळजी करू नका, कारण तुमच्याकडे पेट्रोलवर स्विच करण्याचा पर्याय नेहमीच असतो. ( फोटो: Indian Express)

  • 5/9

    सीएनजी सिलिंडरवर एक्सपायरी डेट तपासण्याची खात्री करा. सामान्यतः, सिलेंडरचे आयुष्य सुमारे १५ वर्षे असते, जे कारच्या आयुर्मानापेक्षा जास्त असते. तरीही, नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा सुरक्षित राहणे केव्हाही चांगले. ( फोटो: जनसत्ता)

  • 6/9

    दर तीन वर्षांनी सीएनजी सिलेंडरची हायड्रो-टेस्टिंग आवश्यक असते. सिलेंडरला गळती नाही, कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही आणि वाहनात वापरणे सुरू ठेवता येईल याची खात्री करण्याचा चाचणी हा आणखी एक मार्ग आहे. उन्हाळ्यात, उच्च ऑपरेटिंग तापमान पाहता हे लक्षणीय असू शकते. (फोटो: Indian Express)

  • 7/9

    तुमच्या कारवर स्थानिक मेकॅनिककडून सीएनजी किट बसवले असल्यास, त्याची सत्यता आणि प्रमाणपत्र तपासणे केव्हाही चांगलं. (Express Photo: Jaipal Singh)

  • 8/9

    ऑटोमेकर्स आता कंपनी-फिट केलेले सीएनजी किट देतात ज्याची किंमत थोडी जास्त असू शकते. परंतु याचा नवीन वाहनाच्या वॉरंटीवर परिणाम होत नाही आणि दीर्घ आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देते. (फोटो: Indian Express)

  • 9/9

    वाहनात सीएनजी किट बसवताना, किट प्रमाणित असल्याची खात्री करणे आणि ते बसवणाऱ्या मेकॅनिकची सक्षम अधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. (फोटो: Indian Express)

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto News

Web Title: 5 ways to take care of your cng car in summer heat ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.