-
C++ व अन्य कोडिंग लँग्वेज शिकून आपण पार्ट टाइम वेब डेव्हलपर म्हणून काम करू शकता. आपण कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी मध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा हे जॉब करू शकता. पूर्ण वेळ नोकरीसाठी अर्ज करताना हा तुमचा अनुभव ग्राह्य धरला जातो.
-
इंटरनेटवर अनेक कंपनी डेटा एंट्री जॉब साठी इंटर्न शोधत असतात. जर तुमचा टायपिंग स्पीड चांगला असेल तर हा जॉब तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.
-
डेटा एंट्रीसाठी एका शीट मधून दुसऱ्या शीट मध्ये डेटा शिफ्ट करण्याचे काम असते त्यात बदल करण्यास सांगितले जात नाही. त्यामुळे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या कामात अर्ज करू शकतात.
-
जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर कॉन्टेन्ट रायटर म्हणजेच लेखक म्हणून तुम्ही काम करू शकता. अनेक डिजिटल मार्केटिंग एजन्सी सध्या सोशल मीडिया पोस्ट,ब्लॉग व वेबसाईट निर्मितीच्या मजकुराच्या लिखाणासाठी लेखकांना कामे देत असतात.
-
कॉन्टेन्टशी संबधित आणखी एक नोकरीची संधी म्हणजे भाषांतर करूनही आपण बरेच पैसे कमावू शकता. परदेशी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी फायद्याची ठरेल. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेच्या शैलीप्रमाणे पुन्हा लिहिणे अशा कामाची सध्या बरीच मागणी आहे.
-
जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर, अनेक मोठ्या कंपनी केवळ आपले उत्पादन तुमच्या स्टोरीज व पोस्ट मध्ये दाखवण्यासाठी सुद्धा पैसे देतात. आपले अकाउंट अशा पद्धतीने तयार करून आपण ब्लॉगिंग करून कमाई करू शकता.
-
ब्लॉगिंगसह आपण व्लॉगिंग म्हणजेच एखाद्या उत्पादनाचे व्हिडीओ बनवून ऑनलाईन पोस्ट करणे हे एक पूर्णतः नवे नोकरीचे क्षेत्र आहे.
-
आपल्याला आवडत्या विषयांचे ऑनलाईन वर्ग घेऊन सुद्धा तुम्ही काम करू शकता.
-
हे विषय शाळा- कॉलेज मधीलच हवेत असे गरजेचे नाही. कला, क्रीडा विशेषतः योगा अशा क्षेत्रातील शिकवण्यांना सुद्धा मोठी मागणी आहे.
विद्यार्थ्यांनो, पार्ट टाइम जॉब शोधताय? ‘या’ ऑनलाईन कामातून भरघोस कमाईची संधी
Online Part Time Jobs: विद्यार्थ्यांनो शिक्षण पूर्ण करताना ऑनलाईन काम करण्याची संधी देणारे हे जॉब प्रोफाइल तपासून पहा
Web Title: Six online part time jobs for students and housewives get chance to earn more svs