-
Ganesh Chaturthi 2022 Prasad Ideas : गणपतीसाठी घरी आल्यावर त्यांच्यासाठी रोज आरती झाल्यावर नैवेद्य दाखवला जातो. तसंतर आपण गणेसोत्सव काळात घरात जे पदार्थ तयार करतो ते बाप्पाला अर्पण करतो. (Photo: Freepik)
-
पण, गणेशाला रोज आरती झाल्यावर गणरायासाठी नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत असते. (Photo: Freepik)
-
१० दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता. (Photo: Freepik)
-
पायसम : पायसम नारळाचे दूध आणि गुळापासून बनवले जाते. पायसम हे केरळमधील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. भातापासून तयार केलेला हा गोड पदार्थ गणपतीला भोग म्हणून अर्पण केला जाऊ शकतो. (Source: Nestle)
-
तिळाचे लाडू: तीळ, गूळ, शेंगदाणे आणि सुखं खोबरं यांपासून तयार केलेले हे लाडू भगवान गणेशाला नैवेद्य म्हणून आवडतील. (Photo: Freepik)
-
खीर: तांदळाची खीर देखील नैवैद्यासाठी योग्य आहे. सुका मेवा, तांदूळ, वेलची आणि साखरेपासून तयार केलेला हा नैवैद्य गणेशाला नक्कीच आवडेल. (Source: Wikipedia)
-
पुरण पोळी: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक पुरण पोळी देखील गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाऊ शकते. खायला खूप चविष्ट असते. (Source: File Photo)
-
बेसन लाडू : तुम्ही गणपतीला तुपात बनवलेले बेसन लाडूही अर्पण करू शकता. (Photo: Freepik)
-
मोतीचूर लाडू : यावेळी मोदकाशिवाय मोतीचूर लाडू बनवून गणपतीला अर्पण करू शकता. आपण ते घरी तयार करू शकता. (Photo: Freepik)
-
मोदक: तुम्ही गणपतीला रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून देऊ शकता. मोदक हा त्यांचा आवडता नैवेद्य आहे. (Photo: Freepik)
-
बासुंदी: गोड कंडेन्स्ड दुधापासून बासुंदी तयार केली जाते. त्यातील ड्रायफ्रुट्स, वेलची आणि जायफळ त्याची चव आणखी वाढवतात.
-
कलाकंद : दुधाचे मिश्रण करून तयार केलेला कलाकंद गणपतीसोबतच सर्व भक्तांना आवडेल. तुम्ही ते नैवेद्य म्हणून तयार करून देऊ शकता.
-
श्रीखंड: हा एक पारंपारिक गोड पदार्थ आहे, जो तुम्ही घरी तयार करू शकता आणि गणपतीला प्रसाद म्हणून देऊ शकता. (Photo: Freepik)
Ganesh Chaturthi 2022: बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर, करा हे सोपे पदार्थ
१० दिवस गणेशाला कोणता प्रसाद अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, घरातले काही पदार्थ सुद्धा वापरून सोपा प्रसाद म्हणून करू शकता.
Web Title: Ganesh chaturthi 2022 bhog items list you can offer these different sweets to ganpati prasad bappacha naivedya prp