-
काही जण मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असतात. मायग्रेनमध्ये अस्वस्थ वाटणे, उल्टी होणे अशी लक्षणे दिसतात.(Photo : Indian Express)
-
मायग्रेनचा असह्य त्रास होत असताना त्या व्यक्तीचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. औषध आणि आहारातील काही पथ्य पाळून मायग्रेनची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.(Photo : Indian Express)
-
पण काही जणांना कोणत्याही औषधांचा फायदा होत नाही. अशावेळी आयुर्वेदातील उपाय करून पाहण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. (Photo : Indian Express)
-
मायग्रेन पेनवर आयुर्वेदात काय उपचार सांगण्यात आले आहेत जाणून घेऊया. (Photo : Financial Express)
-
भिजवलेले मनुके : आयुर्वेदानुसार भिजवलेले मनुके मायग्रेन पेन घालवण्यासाठी मदत करतात. तुम्ही रात्री १० ते १५ मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे भिजवलेले मनुके खा. (Photo : Freepik)
-
अशाप्रकारे भिजवलेले मनुके १२ आठवडे तुम्ही सलग खाल्ले, तर यामुळे वाढलेल्या वातासह शरीरातीत अतिरिक्त पित्त कमी होते. तसेच एका बाजूची डोकेदुखी, मळमळ, ऍसिडिटी ही मायग्रेनची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.(Photo : Freepik)
-
जिरे आणि वेलचीचा चहा : जेव्हा तुम्हाला मायग्रेनचा असह्य त्रास होईल तेव्हा तुम्ही जिरे आणि वेलचीचा चहा पिऊ शकता. (Photo : Freepik)
-
हा चहा बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या, त्यात एक चमचा जिरे आणि एक वेलची टाकून साधारण ३ मिनिटांपर्यंत उकळा. (Photo : Freepik)
-
त्यानंतर हा चहा गाळून घेऊन पिऊ शकता. यामुळे तणाव आणि अस्वस्थ वाटणे कमी होईल. अगदी दुपारी जेवणानंतर किंवा रात्री झोपण्याआधी जर तुम्हाला तीव्र लक्षणे जाणवत असतील, तर तेव्हा तुम्ही हा चहा पिऊ शकता. (Photo : Freepik)
-
गाईचे तूप : शरीरातील अतिरिक्त पित्ताचा समतोल राखण्यासाठी गाईचे तूप उत्तम मानले जाते. (Photo : Indian Express)
-
जेवताना चपाती, भात किंवा भाजीमध्ये तूप मिसळून खाऊ शकता. तसेच रात्री झोपताना दुधामध्ये तूप टाकून पिऊ शकता. (Photo : Indian Express)
-
अशाप्रकारे तुम्ही आहारामध्ये तूपाचा समावेश करू शकता. यामुळे पित्ताचा समतोल राखला जाईल आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होईल. (Photo : Freepik)
मायग्रेनच्या समस्येवर ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करून पाहा, नक्की मिळेल फायदा
मायग्रेनच्या समस्येवर ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करून पाहा, नक्की मिळेल फायदा
Web Title: Ayurveda tips to get rid of migraine pain pns