• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these are the advantages and disadvantages of drinking warm water regularly pns

जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे

September 12, 2022 18:38 IST
Follow Us
  • These are the Advantages and disadvantages of drinking hot water regularly
    1/15

    निरोगी राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण अनेक आजरांपासून लांब राहू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

  • 2/15

    काहीवेळा उत्तम आरोग्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तर काहीजण वजन कमी व्हावे यासाठी सतत गरम पाणी पीत असतात.

  • 3/15

    सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल आजारांमध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

  • 4/15

    अनेकवेळा आपण गरम पाणी पितो, पण त्याचा शरीरावर काय परिणाम होत असेल याबद्दल जास्त माहिती नसते.

  • 5/15

    तज्ञांच्या मते थंड किंवा गरम पाणी पिण्याऐवजी साधे पाणी प्यावे. अपचनाचा त्रास असणाऱ्यांना सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असते, तर काहीजण कायम गरम पाणीच पितात.

  • 6/15

    पण जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराला नुकसानकारक ठरू शकते. यासाठी गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो ही जाणून घेणे आवश्यक आहे.

  • 7/15

    गरम पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया

  • 8/15

    गरम पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या कमी होते. अपचन किंवा ऍसिडिटी जाणवत असेल तर कोमट पाणी प्यावे, यामुळे नक्की मदत होईल.

  • 9/15

    वजन कमी करण्यासाठी गरम पाणी मदत करते. दिवसभरात जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. त्यामुळे वजन न वाढता नियंत्रणात राहते. यासोबतच गरम पाणी प्यायल्याने जास्त भूक लागत नाही.

  • 10/15

    गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. कोमट पाणी आतडयांना हायड्रेट करते, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

  • 11/15

    गरम पाणी पिण्याचे तोटे काय आहेत जाणून घेऊया

  • 12/15

    किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, तसेच डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.

  • 13/15

    रात्रीच्या वेळेस जर तुम्ही गरम पाणी पिऊन झोपला तर तुमची झोप पुर्ण होत नाही. कारण तुम्हाला सतत लघवीला लागल्यासारखे वाटते. तसेच रात्रीच्या वेळी गरम पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांवर दबाव जाणवतो. झोप पुर्ण न झाल्यास अनेक शारीरिक, मानसिक आजरांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गरम पाणी पिणे टाळावे.

  • 14/15

    निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण गरम पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

  • 15/15

    जास्त गरम पाणी प्यायल्याने रक्तातील इलेक्ट्रोलाइट्स पेशींपेक्षा जास्त पातळ होऊ शकतात. रक्त आणि पेशी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी रक्तातील अतिरिक्त पाणी पेशींमध्ये काढले जाते. त्यामुळे पेशी फुगतात आणि मेंदूवर दबाव वाढतो. यामुळे डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवू शकतात. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: These are the advantages and disadvantages of drinking warm water regularly pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.