-
बाळाला आईचे दुध दिल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.
-
नॉर्मल डिलेवरीनंतर बदाम आणि मनुके खावेत. दहा मनुके आणि दहा बदाम मिक्स करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर गरम दूधामध्ये मिक्स करून घ्या. हे दूध रात्री झोपण्याआधी प्या.
-
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात डेयरी प्रोडक्ट्स अर्थात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
-
दालचिनी आणि लवंग टाकून पाणी प्या, यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
-
प्रसुतीनंतर वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असते. ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
-
जायफळ मिक्स केलेलं दूध रोज रात्री प्यावे. हे दूध प्यायल्यानं शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते.
-
मेथीचे पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
-
प्रसुतीनंतर तुम्ही ओव्याचं पाणी प्यायल्यानं बेली फॅट कमी होतो. हे पाणी दिवसभर प्यायल्यानं काही दिवसातच तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतील.
-
हायड्रेटेड राहण्यासाठी आणि पोट भरलेलं ठेवण्यासाठी दिवसभर पाणी प्या. जास्त चरबी कमी होण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या. (फोटो सौजन्य : pixabay )
प्रसुतीनंतर ‘या’ उपायांनी करा वजन कमी; जाणून घ्या क्लुप्त्या…
प्रसुतीनंतर अनेकांचे वजन वाढते. काही जणांना प्रसुतीनंतर बेली फॅट्सची समस्या जाणवते. वाढलेल्या वजनामुळे थकवा जाणवतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.
Web Title: Lose weight with these remedies after delivery pdb