-
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी केली जाते.
-
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवाळीला आपले घर दिव्यांनी सजवून तुम्ही घराला आकर्षक लूक देऊ शकता.
-
घराला उत्तम लूक देण्यासाठी तुम्ही घराच्या भिंती, खिडक्या आणि दारांना लायटिंगदेखील लावू शकता.
-
फुलांनी घर सजावून घर दिव्यांनी सजवा.
-
फुलांनी घर सजावल्याने घर सुंदरही दिसेल आणि घरामध्ये एक छान सुगंधही दरवळेल.
-
छोट्या छोट्या काचेच्या ग्लासमध्येदेखील तुम्ही मेणबत्त्या सजवून ठेऊ शकता.
-
घराचे मुख्य गेट आणि अंगण आकर्षक करण्यासाठी तुम्ही रांगोळी देखील काढू शकता.
-
दिवाळीच्या सजावटीची सुरुवात मुख्य दरवाजापासून होत असते. त्यात वरती फुलं आणि आंब्याची, अशोक वृक्षाच्या पानांनी तयार केलेले तोरण लावू शकता.
-
विविध रंगांच्या काचेच्या बाटलीत घातलेल्या लाईट्सच्या माळा घराला क्लासी लूक देतात.
-
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावा. यासाठी तुम्ही ताज्या फुलांचं किंवा आर्टिफिशिअर तोरणही लावू शकता.
-
अंगणात किंवा घराच्या वरच्या बाजूला आकाशदिवे लावा.
-
दिवाळीसाठी तुम्ही घरात लावता येणाऱ्या छोट्या शोच्या झाडांचा वापर करू शकता. अशी झाडे तुम्ही लाईट्सचा वापर करून देखील सजवू शकता. (फोटो साैजन्य-Pixabay)
Photos : यंदाच्या दिवाळीत ‘अशी’ करा घराची सजावट, घराला येईल उत्तम लूक; जाणून घ्या काही सोप्या टिप्स…
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक लोकांनी घराची साफ-सफाई करून घर सजवण्याची तयारी सुरू केली आहे. या काळात नवनवीन गोष्टींनी घर सुंदर सजवले जाते. सणासुदीच्या काळात घराची सजावट घरात येणाऱ्या प्रत्येकालाच प्रसन्न करते. तुम्ही सुद्धा घर सजवण्याचा विचार करत असाल तर या काही सोप्या टिप्स नक्कीच तुमच्या फायद्याच्या आहेत. चला तर पाहूया घर…
Web Title: Decorate your house this diwali pdb